नागपूर :- नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सिमेंट रस्ते बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून सिमेंट क्राँक्रीट रस्ते प्रकल्प-4 साठी ३०० कोटी रुपये निधी प्राप्त झालेला असून यासंदर्भात निविदा प्रकियेला नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरूवात करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ई-निविदा प्रक्रिया मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबविण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी रु. ३०० कोटींच्या अनुदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहे.
नागपूर महानगरपालिकेने सिमेंट रस्ते प्रकल्प टप्पा- १, २ व ३ अंतर्गत आजपावेतो एकूण १०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. १०० कि.मी लांबीच्या डांबरी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यामुळे डांबरी रस्त्यांना पावसाळ्यात खड्डे पडल्याने नेहमी करावे लागणारे दुरूस्ती कार्य आता बंद झाले असून देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च निश्चित पणे कमी झाला आहे. सध्यास्थितीत शहर सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा ४ करिता शासनाद्वारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परिक्षेत्रात अधिसुचीत विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे अंतर्गत रु. ३०० कोटी महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. टप्पा- ४ अंतर्गत एकूण १४ पॅकेजमधील २३.४५ कि.मी. लांबीच्या एकूण ३३ रस्त्यांचे कामांना दिनांक १ डिसेंबर २०२३ च्या आदेशान्वये शासनाने मंजुरी प्रदान केलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी नागपूर यांनी सदर कामांना दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे.
टप्पा- ४ अंतर्गत पॅकेजनिहाय कामांच्या निविदा दिनांक प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. निविदा मंजुरीअंती कंत्राटदार निश्चिती नंतर प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात येउन सदर प्रकल्प २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. सदर प्रकल्पातंर्गत २३.४५ कि.मी. रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाल्यास, शहर परिक्षेत्रात नागरी सेवा उपलब्ध झाल्याने, वाहतूक सुरळीत होवून, वाहतूकीची कोंडी कमी होईल तसेच, डांबरीकरणाच्या कामांवर होणारा नियमित खर्च कमी होईल. नागपूर करिता चांगले व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होतील, ही माहिती मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी दिली.
टप्पा ४ अंतर्गत राज्य शासनाकडून प्राप्त ३०० कोटी रुपये निधीमधून शहरात रस्त्यांचे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावेत यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागपूर शहरातील सोमलवाडा रोड ते मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग पर्यंत, गोविंद नगर ते स्टेट बँक ते आरबीआय कॉलनी, जयप्रकाश नगर तपोवन मुख्य मार्ग पर्यंत, वर्धा रोड जय दुर्गा ट्रॅव्हल्स ते आरबीआय कॉलनी जयप्रकाश नगर तपोवन मुख्य मार्ग पर्यंत, न्यू स्नेह नगर, खामला रोड ते मालवीय नगर चौक पर्यंत, गुलमोहर सभागृह ते वर्धा रोड पर्यंत, भारत पेट्रोल पम्प (जॉगर्स पार्क सावरकर उद्यान) ते जॉगर्स पार्क फुटबॉल मैदान पर्यंत, स्वावलंबी नगर रोड, पडोळे चौक ते ऑरेंज सिटी रोड पर्यंत, पन्नासे लेआउट बस स्टँड ते दाते नगर गणेश किराणा स्टोर्स, इंद्रप्रस्थ लेआउट ते शिवानंद अपार्टमेंट स्वावलंबी नगर पर्यंत, नीरी रोड ते आठ रस्ता चौक पर्यंत, देव नगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक (वर्धा रोड) ते गजानन नगर पर्यंत, रोसेटा क्लब ते एफसीआय गोदाम पर्यंत, हम्पॅर्याड रोड ते लोकमत चौक बलराज मार्ग पर्यंत, खरे मार्ग धंतोली विजयानंद सोसायटी ते दीनानाथ स्कूल पर्यंत, आनंद टॉकीज ते धंतोली पोलीस स्टेशन पर्यंत, लक्ष्मीनगर झोन कार्यालय ते ऋतुपर्णा अपार्टमेंट (रचना एनक्लेव्ह) पर्यंत, गांधीनगर चौक ते अभ्यंकर नगर चौक ते श्रद्धानंद पेठ चौक (सर विश्वेस्वरैय्या चौक) पर्यंत, राम नगर बाजीप्रभू चौक ते लक्ष्मी भूवन चौक ते ट्रॅफीक चिल्ड्रेन पार्क पर्यंत, डॉ. कॉलनी छत्रपती नगर (छत्रपती सभागृह) ते नागभूमी लेआउट पर्यंत, नागभूमी लेआउट ते वर्धा रोड छत्रपती नगर पर्यंत, बजरंग चौक ते भरणे यांचे निवासस्थान सुरेंद्रगड पर्यंत, धरमपेठ झेंडा चौक ते आदिवासी विकास भवन आरटीओ पर्यंत, करोडपती गल्ली सिव्हिल लाईन्स, भारत पेट्रोल पम्प ते न्यू अपस्टोलिक स्कूल ते परिझाद ब्यूटी पार्लर ते मानवता स्कूल पर्यंत, सुयोग नगर चौक ते रेल्वे यार्ड सुरक्षा भिंत पर्यंत, भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोड, हसनबाग चौक ते गाडगेनगर रमना मारोती ते गजानन महाराज मंदिर पर्यंत, पांडव कॉलेज ते जवाहर वसतीगृह (औरंगजेब चौक) पर्यंत, सीए रोड (हॉटेल अमीर) ते भावसार चौक ते नंगा पुतळा ते तीन नळ चौक पर्यंत, दही बाजार उड्डाणपूल ते ऑटोमोटिव्ह चौक पर्यंत, तथागत चौक ते ग्रामीण पोलीस मुख्यालय ते लाल गोदाम ते रिंग रोड कामठी रोड पर्यंत, प्रताप नगर चौक ते ऑरेंज स्ट्रीट रोड (सोमलवार हायस्कूल रोड) पर्यंत, मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मेन रोड आणि महादेव मंदिर रोड पर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध होईल व त्यामुळे त्यांना सुविधा मिळणार आहे.
उपरोक्त सिमेंट रोड बांधकाम कार्यासाठी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकल्प शाखेमार्फत निविदा मागविण्यात आलेल्या आहेत