नागपूर :- लकडगंज झोन मध्ये बकाया मालमत्ता कराचे वसुली करीता मौजा भांडेवाडी येथील ३० भुखंड जप्ती करीता जप्तीची धडक मोहिम राबविण्यात येत असून आज दि. २७.१२.२०२४ रोजी खालील नमुद मौजा भांडेवाडी येथील नागपूर खालील नमुद एकुण ३० खुले भुखंड बकाया मालमत्ता कर रक्कम रूपये 15,66,435/- चे वसुली करीता जप्त करण्यात आले आहे.
करीता संबंधित मालमत्ता धारकांना सुचित करण्यात येते की, नागपूर महानगरपालिकेतर्फे कर वसुली त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे नमूद मालमत्तेचा थकीत कराचा भरणा दि. ३१.१२.२०२४ चे आत करावा अन्यथा सदर मालमत्तेचे लिलाव करून बकाया कर वसूल करण्यात येईल तसेच झोन मधील इतरही मालमत्ता धारकांना आवाहान करण्यात येते की, त्यांनी बकाया मालमत्ता कर दि. ३१.१२.२०२४ चे आत भरून जप्ती कार्यवाही टाळावी.
सर्दहु कार्यवाही उपायुक्त, मिलिंद मेश्राम याच्या निर्देशानुसार झोनचे सहा. आयुक्त विजय धुल, यांच्या मार्गदार्शनात निरीक्षक मनिष तायवाडे, संतोष समुन्द्रे, नकिव खान, आशिष हिंगणेकर, चेतन बेहुनिया हयांचेद्वारे करण्यात आली.