प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत 3 हजार 627 लाभार्थी

नागपूर :- सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूर परिमंडलातील तब्बल 3 हजार 627 ग्राहकांनी घरावर सौर रुफ़ टॉप बसवून वीज निर्मिती सुरु करण्यासोबतच मोफ़त वीज मिळविणे सुरु केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 33 ग्राहकांसोबत वर्धा जिल्ह्यातील 594 ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांना सौर रु टॉप बसविणे सहज आणि जलद व्हावे यासाठी महावितरणने 10 किलोवॅट पर्यंत क्षमतेच्या सौर रुफ़ टॉप बनविण्यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवहार्यतेसाठी स्वयंचलित मान्यता (डिम्ड ऍप्रूव्हल) देणे सुरु केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली आहे. या योजनेत आजपर्यंत नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 33 आणि वर्धा जिल्ह्यातील 594 अश्या नागपूर परिमंडलातील तब्बल तीन हजार 627 ग्राहक सहभागी झाले आहेत. यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक महाल विभागातील 1 हजार 29, कॉग्रेसनगर विभागातील 717, सिव्हील लाईन्स विभागातील 601, गांधीबाग विभागातील 256 मौदा विभागातील 135, सावनेर विभागातील 115, बुटीबोरी विभागातील 94, उमरेड विभागातील 59 तर काटोल विभागातील 27 ग्राहकांचा समावेश आहे, याशिवाय वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभागातील 543, आर्वी विभागातील 29 तर हिंगणघाट विभागातील 22 ग्राहकांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला 78 हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते, अशी ही योजना आहे. या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.

ग्राहकांच्या अर्जाला छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी महावितरण ग्राहकांना मदत करते. सोबतच 10 किलोवॅटपर्यंत पीव्ही क्षमतेच्या रूफटॉप सोलर ऍप्लिकेशन साठी आवश्यक तांत्रिक व्यवहार्यतेसाठी स्वयंचलित मान्यता (डिम्ड अप्रूवल) दिली आहे. उपयोजित सोलर पीव्ही क्षमता रूफ टॉप सोलर ग्राहकाच्या मंजुर भारापेक्षा अधिक असेल, तर अशा ग्राहकांच्या भार वाढीसाठी लागू केलेल्या पीव्ही क्षमतेपर्यंत (जास्तीत जास्त 10 किलोवॅटपर्यंत) मंजूर भार वाढविण्यासाठीचा अर्ज स्वयंचलितपणे सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि त्यनुसार ग्राहकांना पैश्याचा भरणा करण्याचे सूचित केले जाईल. भार वाढीसाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर, भार वाढवणे आपोआप लागू होईल. याशिवाय ग्राहक आणि सोलर रुफ़ टॉप बसविणा-या एजन्सीजसाथी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रीया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. या योजनेत नागपूर परिमंडलात आतापर्यंत 8 हजार 017 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी फेब्रुवारी महिन्यात 10, मार्च महिन्यात 158, एप्रिल महिन्यात 419, मे महिन्यात 695, जून महिन्यात 1843 तर जुलै महिन्यात आतापर्यंत 502 अशी नागपूर परिमंडलात आजवर तब्बल 3 हजार 627 ग्राहकांकडे सोलर रूफ टॉप बसविण्यात आले असून त्याची स्थापित क्षमता सुमारे 15 हजार 335 किलोवॅट आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीज बिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा आयुक्त सिर्फ BUILDER LOBBY के लिए सक्रिय 

Wed Jul 17 , 2024
– चाय से ज्यादा केतली गर्म,चौधरी और गोयल के PA सता रहे अधिकारी व कर्मियों को और अपना उल्लू सीधा कर रहे क्यूंकि अंधेर नगरी चौपट राजा …….बेहतरीन आयुक्त,अतिरिक्त आयुक्त देख चुकी जनता को मुंढे के बाद चौधरी जैसे अधिकारी से त्रस्त जनप्रतिनिधि  नागपुर :- एक था तुकाराम मुंढे उसके थे 2 आपूर्तिकर्ता, जिन्होंने अपने अल्प कार्यकाल में सिस्टम को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!