३ जानेवारीपासून चंद्रपूरात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना ‘कोव्हॅक्सिन लस’ 

– शहर महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची माहिती 
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मागील १६ जानेवारी २०२१ पासून कोविड१९ लसीकरणाला सुरुवात झाली. ९५ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ६२ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आता ३ जानेवारीपासून चंद्रपूरात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी आज ३० डिसेंबर रोजी दिली. 
 
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे वाढते कोरोना रुग्णांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण वाढविण्यासाठी ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येईल. १५ ते १८ वर्षे वयोगटातील नवीन लाभार्थी हा २००७ वा त्यापूर्वी जन्मलेला असावा. लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा दि. १ जानेवारी २०२२ पासून सुरु होईल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी मनपा प्रशासनाद्वारे स्वतंत्र लसीकरण केंद्र निश्चित करण्यात येणार असल्याचे डॉ. वनिता गर्गेलवार यांनी सांगितले.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राजमाता जिजाऊ अर्थसहाय्य योजनेमुळे दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणास मदत -  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Fri Dec 31 , 2021
-नागपूर जिल्हा परिषदेमार्फत राबविली जाणार योजना     नागपूर :  आधाराची गरज असणाऱ्या ग्रामीण भागातील बहुदिव्यांग बालकांच्या मातांना जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ अर्थसहाय्य योजनेतून दरमहा 500 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग बालकांची काळजी, संरक्षण तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले.             जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com