मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत

Ø योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Ø गॅस एजन्सीधारकांसोबत बैठक

यवतमाळ :- राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गॅस कंपनीचे सेल्स ऑफिसर आणि एजन्सीधारक यांची सभा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी मेश्राम यांनी केले.

योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ३ गॅस सिलेंडरचे मोफत पुनर्भरण वितरण करणे, मोहिमेची जनजागृती करणे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री उज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांनी आपल्या संबधित गॅस एजन्सीमध्ये बँक पासबुक आणि आधारकार्डसह जावून ई-केवायसी करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रयास ग्रीन सिटी या स्वयंसेवी संस्थेद्वारे मनपा नागपूर च्या संजय नगर हिंदी माध्यमिक शाळा येथे नोटबुक वितरण

Tue Aug 13 , 2024
नागपूर :- प्रयास ग्रीन सिटी संस्था या स्वयंसेवी संस्थेद्वारे मनपा नागपूर च्या संजय नगर हिंदी माध्यमिक शाळा येथे नोटबुक वितरणाचा कार्यक्रम आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. प्रत्येक विद्यार्थ्यास पाच नोटबुक देण्यात आले. एकूण 550 विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर नगरीचे डी.सी.पी श्री अनिकेत कदम उपस्थित होते, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका व महाराष्ट्र राज्य महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com