पुणे येथे 22 सप्टेंबरपासून दुसरी खेलो इंडिया लीग

नवी दिल्ली :- भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र, मुंबई यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने दुसरी खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीग (शहर/विभागस्तर) 2023 ही स्पर्धा पुणे येथे होणार असल्याची घोषणा केली आहे.

ही स्पर्धा 22 सप्टेंबर 2023 पासून बाबूराव सणस मैदान, सारसबाग, पुणे, येथे होणार आहे. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट श्रेणींमध्ये) सहभागी होतील. एक खेळाडू जास्तीत जास्त 2 प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो.

या लीगमध्ये होणा-या विविध क्रीडाप्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

ट्रॅक आणि फील्ड: 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मीटर धावणे; लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक.

खेळाडूंनी आपली नावे खालील लिंकवर नोंदणी करावीत :

http://www.smrsports.in/athletic/registration/1694443132R1Fg1s5hIkqOzcm9fJYxbNhfgyKhtenM

खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीगमध्ये महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील महिला खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. धावणे, उडी, थ्रो आणि रोड रेस यासह विविध ट्रॅक आणि फील्ड क्रीडा प्रकारात खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.

खेलो इंडिया महिला लीगचा मुख्य उद्देश खेळाडूंना स्पर्धा करण्यासाठी आणि करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांचे पाऊल भक्कम करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथील स्मारक उभारण्याच्या कामाला गती द्यावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

Fri Sep 22 , 2023
मुंबई :- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांसह सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींची मागणी आहे. या मागणीचा विचार करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक प्रेरणास्थान तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा. यासंदर्भातील कामे गतीने पूर्ण करावीत, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com