संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथे एका कुलूपबंद घरी अज्ञात चोरट्याने अवैधरित्या प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व इतर आभूषण असा एकूण 29 हजार 200 रुपयांची घरफोडी केल्याची घटना 13 मे च्या मध्यरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी सुनील भातपोहरी वय 35 वर्षे रा गुडशेड रस्ता रामगढ ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 380,457 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे त्यांच्या परिवारासह 6 मे ला ओडीसा येथे गेले होते तर त्याच्या घराची चाबी शेजारच्या विशाल डोंगरे यांच्याकडे दिली होती तोच घरची देखरेख करीत होता .13 मे ला कुणीतरी अज्ञात चोरट्याने घरात अवैधरित्या शिरून घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील 10 ग्राम वजनाचा सोन्याचा झुमका व एक जोड किमती 20 हजार रुपये, 3 ग्राम वजनाचे सोण्याचे 2 लॉकेट किमती 3 हजार रुपये,दोन पितळीचे गुंड किमती 2 हजार रुपये,200 रुपये किमतीचा एक पांढरा धातूचा पाय पट्टीचा जोड व इतर साहित्य असा एकूण 29 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले.यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.