नागपूर :- २३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चात, लाठीचार्ज व चंगराचेंगरी मध्ये आदिवासींना जीव गमवावा लागला. यावेळी 114 बांधवांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 23 नोव्हेंबरला शहीद श्रद्धांजली दिन, शासना च्यावतीने आयोजित केला जातो.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाच्यानुसार विविध आस्थापना सहकार्य करीत असतात. या कार्यक्रमाची नियोजन आदिवासी गोवारी शहीद स्मारक समिती झिरो माईल नागपूर च्यावतीने करण्यात येते. यावर्षी 28 व्या शहीद स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम 23 नोव्हेंबर 2022 रोजी, स्मारक परिसरात आयोजित करण्यात आलेला आहे. शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष, पदाधिकारी, नेते, सामाजिक संघटनांची पदाधिकारी, यावेळी उपस्थित असतात. यानिमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे माजीमंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार डॉ. परिणय फुके माजीमंत्री, आमदार विकास ठाकरे, आमदार विनोद अग्रवाल, आमदार रामदास आंबटकर आणि जयप्रकाश गुप्ता व डॉ.वामन शळमाके (आदिवासी सेवक ) यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. श्रद्धांजली दिनानिमित्त 22 व 23 नोव्हेंबरला सांस्कृतिक पारंपारिक पूजाविधी, रोगनिदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा. असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शासना च्यावतीने देण्यात आलेल्या सूचनांची पालन करावे अशीही विनंती करण्यात आली.
समाज बांधवांकरिता विशेष सूचना :
बाहेरून येणाऱ्या समाज बांधवांनी प्रवासा दरम्यान विशेष काळजी घ्यावी. वाहने सुरक्षित चालवावी. वाहनांवर संघटनांचा ध्वज व बॅनर लावावे. रेल्वेने, बस, ट्रॅव्हल्सने, प्रवास करणाऱ्यांनी आपापल्या संघटनेचा बिल्ला लावावा. आणि इतर वाहनांना तथा पादचाऱ्यांना आपला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आयोजकांनी म्हटले आहे.
आदिवासी गोवारी शहीद स्मारक समिती झिरो माईल नागपूर च्यावतीने येत्या 23 नोव्हेंबर रोजी, 28 वा. शहीद वर्धापनदिन आणि 114 शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. करिता सर्व समाज बांधवांनी 23 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.