पीएम स्वनिधी योजना अंतर्गत २८८४ पथविक्रेत्यांना मिळाला १०,०००/- रुपये कर्जाचा लाभ

४९५ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा लाभ,६ लाभार्थ्यांनी घेतला ५०,०००/- हजार कर्जाचा लाभ

१०१० लाभार्थी २० हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र   

 चंद्रपूर :- प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत २८८४ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ४९५ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार रुपये कर्जाचा लाभ घेतला,६ लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे कर्ज प्राप्त झाले असुन इतर १०१० लाभार्थी २० हजार रुपये कर्जासाठी पात्र झाले आहेत.

दिनांक ०३/०२/२०२३ ला चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे यासंदर्भात आढावा बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक प्रशांत धोंगळे, चंद्रपूर शहरातील सर्व राष्ट्रीय व खाजगी बँक यांचे प्रतिनिधी व चंद्रपूर शहरातील पथविक्रेता संघटना यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच मनपाचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे.

शहरातील पथविक्रेत्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केद्र /नागरी सुविधा केंद्र) व ग्राहक सेवा केंद्र येथे ऑनलाईन अर्ज करावेत किंवा महानगरपालिकेच्या नागरी उपजीविका केंद्राकडे ( जुबली हायस्कूल समोर ) अर्ज करता येईल. तरी शहरातील पथविक्रेते यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपुर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पटोले-थोरात वादातील इनसाईट स्टोरी, काँग्रेसमध्ये राजकीय हाहाकाराचं कारण काय? 

Tue Feb 7 , 2023
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या जे सुरुय ते अतिशय अनपेक्षित असंच आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. दुसरीकडे काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे त्यांच्या संयमी स्वभावामुळे ओळखले जातात. दोन्ही नेते हे त्यांच्या जागेवर अतिशय प्रतिष्ठावंत असेच आहेत. पण याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाद उफाळल्याने काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालंय. विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com