नागपूर :-भारतीय गणराज्याच्या 73 व्या स्मृतीदिन निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने 26 जानेवारी ला दुपारी 12 वाजता संविधान चौकात संविधान व राष्ट्रीय ध्वज रॅली काढून, भारतीय संविधानाला, राष्ट्रीय ध्वजाला व संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल.
बसपाच्या प्रदेश, जिल्हा, विधानसभा, सेक्टर व बुथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी संविधान, राष्ट्रध्वज व संविधानाच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी आपल्या आपल्या परिसरातील कार्यक्रम आटोपून दुपारी 12 वाजता संविधान चौकात एकत्र यावे.
देशभर संविधानाची जोरात चर्चा सुरू असल्याने संविधान समजून घेण्यासाठी व राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करून देशात शांतता व सुव्यवस्था नांदविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “हरघर संविधान” या अभियान अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाळा तिथे संविधान, कार्यालय तिथे संविधान यानुसार संविधानाचे मोफत वाटप करून 26 जानेवारी या गणराज्य दिनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे, त्यातील हक्क व अधिकारांचे वाचन करावे असे आवाहन बसपा चे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी शासनाला केले आहे.