महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प)
• पारंपारिक पोशाखात विद्यार्थ्यांनी अनुभवली राईड
नागपूर :-देशातील 11 राज्यांतील सुमारे 250 विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सदस्यांनी मेट्रो रेल्वेच्या प्रवासाचा आनंद लुटला. रेल्वे प्रवासादरम्यान मेट्रो स्टेशनच्या इमारती, तेथील व्यवस्था, स्वच्छता आणि शहराचे दृश्य पाहून विद्यार्थी भारावून गेले. राष्ट्रीय सेवा योजना नागपूर विदयापीठाचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, प्रादेशिक संचालक डॉ. डी. कार्तिकेन, डॉ.विनोद खेडकर, डॉ.प्रशांत कडू यांच्या नेतृत्वाखाली विविध 11 राज्यातील विद्यार्थी मेट्रो राईड केली. मेट्रो स्टेशनचे सौंदर्य आणि भव्यता पाहून विद्यार्थी थक्क झाले. विद्यार्थ्यांनी झिरो माईल ते खापरी स्टेशन आणि खापरी ते झिरो माईल स्टेशन असा मेट्रोचा प्रवास केला. मेट्रो प्रवासाच्या आधी विद्यार्थ्यांना मेट्रोच्या एकूण कामकाजाची माहिती देण्यात आली.
• पारंपारिक पोशाखात विद्यार्थ्यांनी प्रवास केला: प्रवासादरम्यान विविध राज्यातील अनेक विद्यार्थी आपापल्या राज्यातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले होते. तरुण कलाकार छोट्या वाद्यांच्या तालावर गाणी आणि नृत्यातून आपापल्या राज्यातील संस्कृतीचा प्रसार करत होते. राजस्थान, आसाम, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि इतर राज्यांची संस्कृती विद्यार्थ्यांच्या या प्रवासात अनुभवायला मिळाली. मेट्रो प्रवासा दरम्यान राष्ट्रीय एकात्मतेची भावना जिवंत राहिली, विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक नृत्य, गाणी सादर केली. बहुतेक विद्यार्थी पहिल्यांदा मेट्रोने प्रवास करत होते.
• आनंद द्विगुणित झाला : डॉ. पिसे
चर्चे दरम्यान डॉ.सोपानदेव पिसे म्हणाले की, मेट्रोमध्ये प्रवास केल्याने आज राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा आनंद द्विगुणित झाला. ग्रीन मेट्रोसोबतच मला देशातील विविध राज्यातीलविद्यार्थ्यांसह मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा बहुमान मिळाला आहे. नागपूर मेट्रो ही खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या सोइ आणि सुरक्षा यंत्रणा सज्जअसल्याचे पाहून आपल्या शहराबद्दल आपल्याला अभिमान वाटला असे ते म्हणाले.
मेट्रोने मला भुरळ घातली: डॉ. कार्तिकेन
राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रादेशिक संचालक डॉ. डी. कार्तिकेन यांनी मेट्रो राईडनंतर झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले की, आज नागपूर मेट्रोने आपल्या सर्वांची मने जिंकली आहेत. प्रवासादरम्यान आज जे अनुभवले ते ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले, सुंदर आणि पद्धतशीर आहे. नागपूरची मेट्रो जगातील कोणत्याही देशापेक्षा कमी नाही. विविध राज्यांतील विद्यार्थी मेट्रोच्या प्रवासामुळे खूप खूश आहेत. मेट्रोच्या प्रवासाच्या आठवणी ते प्रत्येक गावात घेऊन जातील.
चर्चेदरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विनोद खेडकर, डॉ.राजीव बुरीले, अजय शिंदे, डॉ.अविनाश अवचट, ईपीआय सेंटर अहमदनगरचे डॉ.बोरुडे, डॉ.प्रशांत कडू यांनी मेट्रो रेल्वे सेवेचे कौतुक केले, झिरो माईल येथे प्रवास करत स्टेशन संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी फ्रीडम पार्कला भेट देऊन प्रवासाची सांगता केली.