जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

– पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश

– जलजीवन मिशन अंतर्गत धुळे, नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी

मुंबई :- जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावावी. जलजीवन मिशन अंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

विविध जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांतील कामांच्या स्वतंत्र आढावा बैठका मंत्रालय येथे झाल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर , आमदार विक्रम सावंत यांच्यासह प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, कार्यकारी अभियंता पलांडे, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, एस सी निकम, यासह संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी पाणीपुरवठा योजनातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु कामांविषयी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांची दखल घेतली. पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकल्प अंतर्गत जत 29 गावांसाठी सुरू असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये निधी मंजूर आहे. 29 गावांपैकी ज्या गावांना शाश्वत स्रोत नाहीत त्या गावांसाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे पूर्ण होण्यासाठी गती दिली जावी. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून बाबी निश्चित कराव्यात. ग्रामपंचायतीकडून स्वीकृती व लोकवर्गणी ठरावाबाबत अडचण येणाऱ्या गावातील अडथळे दूर करण्यात यावे असे सांगितले.

यावेळी पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील कापडणे, सोनगीर, बेटावद , मसदी , सामोडे आणि जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा स्वतंत्र आढावा घेतला. शिथिलता आलेल्या कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी सतत भेट देऊन वेळेत कामे व्हावी त्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.

शिंदखेडा व येवला तालुक्यातील कामांची स्थिती असमाधानकारक असून शिंदखेडा येथील काम सहा महिन्यापासून बंद आहे, याबाबत नाराजी व्यक्त करून संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावून पुढील कारवाई करण्याचे, निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

सोनगीर येथील काम या महिन्याअखेरीस पूर्ण होणार आहे. तर मसदी येथील दोन तीन महिन्यात पूर्ण होईल. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत 560 कामे पूर्ण झाले असून “हर घर नल से जल” साठी घोषित करण्यात आली आहे यापैकी 104 कामे प्रमाणित झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंशत: रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन

Thu Aug 22 , 2024
– मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना  मुंबई :- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत दि. ०९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्हयातील ९२९४ इतके Disapproved म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करुन Online Resubmit करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी  तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज Resubmit करावे, जेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!