यवतमाळ :- बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे या महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकशाही दिनात जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, तसेच इतर सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सदर लोकशाही दिनी एकुण 201 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात अस्वीकृत 196 सामान्य व 5 स्वीकृत अशा तक्रारींचा समावेश आहे. लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. जिल्हा लोकशाही दिनातील सर्व प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढण्याबाबत संबंधित विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.