पहिल्या दिवशी 360 पथविक्रेत्याची नोंदणी !
वाडी :- वाडी नप मध्ये स्थापन झालेल्या पथविक्रेता नोंदणी समितीच्या पहिल्या बैठकीत निश्चित केल्यानुसार वाडी परिसरातील पथविक्रेत्यांच्या 2 दिवसीय नोंदणी शिबिराला गुरुवारी प्रारंभ करण्यात आला.
न्यायालय व शासन निर्णयानुसार नप क्षेत्रात पथविक्रेत्याना नोंदणी करणे बंधनकारक झाल्याने नप ने एका खाजगी संस्थेकडे पथविक्रेत्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.याच नियोजनानुसार नप च्या खुल्या प्रांगणात 2 दिवसीय विशेष नोंदणी शिबीराला मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या निर्देशानुसार व उपमुख्याधिकारी रत्नमाला फटींग यांच्या मार्गदर्शनात पथविक्रेता समिती चे विद्युत अभियंता नंदन गेडाम, भारत ढोके, समिती सदस्य प्रा.सुभाष खाकसे, नरेशकुमार चव्हाण, अजय देशमुख, नानाभाऊ चव्हाण, शमीम शेख, राहुल शाहू, सांरंग पेशने यांच्या उपस्थितीत नोंदनी प्रक्रियेला प्रारंभ झाला.दिवसभर सम्पन्न नोंदणी शिबिरात परिसरातील 360 पथविक्रेत्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.शुक्रवारी ही नोंदणी कार्यवाही सुरू राहील त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या वाडी नप क्षेत्रातील पथविक्रेत्यांनी आधार कार्ड, निवासी प्रमाण, व फोटो घेऊन शिबिरात नोंदणी करून भविष्यातील सुविधा व नियोजनासाठी नप ला सहकार्य करावे असे आवाहन नप प्रशासन व समिती ने केले आहे.