नागपूर : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित 9 तक्रारींचा आढावा घेण्यात आला. नवीन 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्यात.
यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार निलेश काळे, तहसिलदार अरविंद सेलोकार यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.