आशीष राउत, खापरखेडा
खापरखेडा – पोलीस स्टेशन खापरखेडा येथे दि.19/04/2022 रोजी चनकापूर शिवारातील गुडधे फॉर्म हाउस, चनकापूर येथे घरी झोपले असता अज्ञात 04 ईसमाने फॉर्महाऊस चे मागील दार तोडुन घराच्या आत प्रवेश करून चाकुचा धाक दाखवून वृध्यांच्या डोळयावर पट्टी बांधुन त्यांच्या पलंगावरील गादीखाली ठेवलेले नगदी 2000 रू कानातील सोन्याची जुनी बाळी वनज 03 ग्रॅम कि 10000 व नोकिया कपनीचा मोबाईल कि 1000 रू असा एकूण 13000 रू चा माल जबरीने हिस्कावून नेल्याचे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून पो.स्टे ला अनुक्रमे 278 / 2022 कलम 394,452,506 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता .
सदर गुन्हयाचे तपासात करीत असताना पो. स्टे खापरखेडाच्या डी.बी. पथकाला मुख्याबिराव्दारे मिळालेल्या माहितीवरून गुन्हयातील संशयीत आरोपी हे लाखणी जि. भंडारा येथे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर आरोपीतांचा लाखणी येथे शोध घेत असताना आरोपी नामे अनिल डोमाजी बाम्हणकर वय 23 वर्ष रावार्ड नं. 2 साई नगर, चनकापुर व एक विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेवून त्यांना सदर गुन्हयाचा अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली. सदर गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली हिरो. प्लेझर गाडी क एम. एच.40.सी.डी. 5677 ही जप्त करण्यात आली. तसेच घटने दिवशी गुन्हा करतांना आरोपी अभिषेक उर्फ मुस्टी भगवानदिन वर्मा रा. शिव नगर चनकापुर व एक विधीसंघर्ष बालक हे सोबत असल्याचे सांगीतल्याने त्यांना चनकापुर येथुन ताब्यात घेण्यात आले . सदर गुन्हयात आरोपी नामे 1) अनिल डोमाजी बाम्हणकर वय 23 वर्ष रा.वार्ड नं. 2 साई नगर, चनकापुर 2) सोबत अभिषेक उर्फ मुस्टी भगवानलदिन वर्मा वय 19 वर्ष रा. शिव नगर चनकापुर यांना गुन्हयात अटक करण्यात आली व दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास पो.उप.नि सुर्यप्रकाश मिश्रा करीत आहे.
सदर कार्यवाही विजयकुमार मगर पोलीस अधिक्षक, नागपुर (ग्रा), राहुल माकणीकर, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर (ग्रा). राजेंद्र, उपविभागीय पोलीस अधिकारी, कामठी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली हृदयनारायण यादव, पोलीस निरीक्षक, डी. बी पथकचे सपो.नी दिपक कांक्रेडवार, पो.ह. उमेश ठाकरे, पो.ह.आशिष भुरे, पो. ना. प्रमोद भोयर, राजु भोयर, पो. शि. नूमान शेख यांनी पार पाडली.