संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र जानेवारी :-1 जानेवारी 1818 साली झालेल्या भीमा कोरेगावच्या रंनसंग्रमात पेशव्यांच्या सैन्यविरुद्ध जिंकु किंवा मरू या भावनेशि 28 हजार पेशव्या सैनिकाना फ़क्त 500 महार सैनिकांनी ठार मारुंन विजय मिळविला होता तेव्हा या वीर भीम सैनिकांच्या स्मरणार्थ आज कामठित विविध आंबेडकरी समाज संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन 205वा महोत्सव वर्ष म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .
यानुसार विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील परिसरात सिनियर ज्युनिअर विचार एकता विचार मंचच्या वतीने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून भीमा कोरेगाव विजयस्तंभास अभिवादन वाहण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी अनुयायी महेंद्र कापसे,उदास बन्सोड,दुर्वास सहारे,आनंद मेश्राम, अंकुश बांबोर्डे,मुनिराज सहारे,अनुप कांबळे,विजय डोंगरे,पुरुषोत्तम डोंगरे, प्रकाश कोकर्डे,गौतम मेश्राम, सीध्दार्थ भीमटे,बुद्धम भीमटे,सुदेश रंगारी,विलास बन्सोड,श्याम बोरकर,ग्यानेश्वर रामटेके,उत्तम खोब्रागडे ,विजय चांदोरकर, मुन्ना नागदेवे, सुखराम वांद्रे,रवींद्र गजभिये,हाऊसराम मेश्राम,दिनेश पाटील,सुदाम डोंगरे ,सुरेश गजभिये आदी उपस्थित होते तसेच प्रोग्रेसिव्ह मुव्हमेंट संघटना, बहुजन समाज पार्टी,वंचित बहुजन आघाडी तसेच इतर सामाजिक संघटनेच्या वतीने आज सकाळी 11 वाजता जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून विशेष बुद्ध वंदना घेत सामूहिक अभिवादन वाहण्यात आले . याप्रसंगी आंबेडकरी अनुयायी उदास बन्सोड,राजेश गजभिये, दिपंकर गणवीर,अनुभव पाटील,सुभाष सोमकुवर,मनीष,विकास रंगारी,गीतेश सुखदेवें, कोमल लेंढारे,मंगेश,रायभान गजभिये, विद्या भीमटे ,सुधा रंगारी,सुगत रामटेके, सुरेश गजभिये,राजेश ढोके,प्रशांत नगरकर,अमित भैसारे,सुमित गेडाम,मिथुन चांदोरकर,सचिन चांदोरकर,शालीकराम अडकणे आदी उपस्थित होते.