– विदर्भ क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे आयोजन
– विदर्भातील महिला व पुरुष संघाची उपस्थिती
काटोल :- स्थानिक विदर्भ क्रिडा व सांस्कृतिक मंडळ काटोल व्दारा स्व. प्रा. सुनिल सोनारे, स्व. राकेश घिचेरीया, स्व. जिवन जुमनाके, स्व. राकेश सोनटक्के यांचे स्मरणार्थ विदर्भस्तरीय महिला व पुरुष गट खो खो स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन नगर परिषद शाळा क्रमांक ३ चे मैदानावर दिनांक १६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे, अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ विजय धोटे, विदर्भ खो खो असोसिएशनचे अध्यक्ष सुहास पांडे, असोसिएशनचे सचिव सुधीर निंबाळकर, माजी गटशिक्षणाधिकारी पुरुषोत्तम भड, माजी नगराध्यक्षा वैशाली ठाकुर, तानाजी थोटे, भाजपचे नेते अयुब पठाण, जयप्रकाश जयस्वाल, नितीन धोटे, माया शेरकर, माजी नगरसेवक राजू चरडे भाजपचे शहर अध्यक्ष विजय महाजन, महामंत्री सोपान हजारे, विदर्भ क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा सोनारे, स्पर्धेचे संयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व श्री क्षेत्र अनुसया माता देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त किशोर गाढवे यांचेसह क्रिडारसिक प्रामुख्याने उपस्थित होते.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुरुष संघामध्ये स्थानिक विदर्भ क्रिडा मंडळ, विदर्भ युथ, तसेच महाराष्ट्र क्रिडा मंडळ नागपूर, जयहिंद क्रिडा मंडळ यवतमाळ, राजापेठ स्पोर्टींग क्लब अमरावती, शेषस्मृती क्रिडा मंडळ तळवेल, तुळजाभवानी क्रिडा मंडळ खल्लार, विदर्भ क्रिडा मंडळ नागपूर, श्रीराम क्रिडा मंडळ मुसेवाडी, साई युवक क्रिडा मंडळ अमरावती, विदर्भ क्रिडा मंडळ (ब), सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ हिंगणा, अनंत क्रिडा मंडळ अकोला, नवविदर्भ क्रिडा मंडळ पवनी आणि महिला संघ विदर्भ क्रिडा मंडळ काटोल, नवजयहिंद क्रिडा मंडळ यवतमाळ, मराठा स्पोर्टींग क्लब अमरावती, छत्रपती क्रिडा मंडळ नागपूर, नवमहाराष्ट्र श्रीराम क्रिडा मंडळ, अनंत क्रिडा मंडळ अकोला, ह्युमॅनिटी स्पोर्टींग क्लब परतवाडा, तालुका क्रीडा संकुल वरोरा, विदर्भ यूथ काटोल या नामवंत चमूचा समावेश आहे.