लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :-  मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत ३६ जिल्हयांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरीत करण्यांत आले याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हानिहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे.

आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील १५ दिवसांत तालुकानिहाय व जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करण्यात येत असून पात्र लाभार्थींनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे, असेही महिला व बालविकास विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दोन-दोन आमदार असूनही रखाडलेल्या उडणपुलाचा प्रश्न मार्गी लागेना - माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

Tue Mar 5 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -7 मार्च ला कामठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा कामठी :- केंद्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विकासकामातून कामठी मतदार संघातील रमानगर उडानपूल बांधकामासाठी 65 कोटी 29 लक्ष रुपयाच्या मंजूर निधीतून उडानपूल बांधकाम सुरू असून बांधकाम पूर्ण करून देण्याच्या निर्देशित सात वर्षांची मुदत संपूनही संबंधित कंत्राटदारांच्या मनमणीपणामुळे काम पूर्णत्वास आले नसून उलट कामात संथपणा सुरू आहे.तर दुसरीकडे आजनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com