शहरातील 1681 दिव्यांग व्यक्तींनी घेतला दिव्यांगत्व प्रमाणपत्राचा लाभ

‘राष्ट्रीय दिव्यांग दिन’ सप्ताहाला उत्स्फुर्त प्रतिसाद

४४०७ नागरिकांनी विविध कल्याणकारी योजनांच्या स्टॉलला भेट.

नागपूर :-  ‘राष्ट्रीय दिव्यांग दिन’ सप्ताहाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नागपूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दिव्यांग दिन’ सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींकरिता दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि UDID CARD (आधार कार्ड) देण्यासाठी विशेष दिव्यांगत्व तपासणी व निदान मोहिम कार्यक्रम १ ते ६ डिसेंबर दरम्यान पार पडला. 

राष्ट्रीय दिव्यांग दिन सप्ताहाअंतर्गत कालावधीत शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसर येथे करून पाच दिवसात विविध प्रवर्गातील एकूण १६८१ दिव्यांग व्यक्तींना अडथळा विरहित वातावरणात दिव्यांगत्व प्रमाणपत्राचा लाभ देण्यात आला. सिकल सेल, थेलेसेमिया, हीमोफीलिया या रक्त संबंधित (Blood Related) दिव्यांग व्यक्तींना सुद्धा कुठलीही अड़चन न येता प्रथमच शिबिराच्या माध्यमातून १०३ व्यक्तींना लाभ देण्यात आला. पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लवकरच दिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपुर येथे उपलब्ध करून देण्यात येतील.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता तथा उद्धिष्टे साध्य करण्यासाठी, समाज कल्याण उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाने, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, म.न.पा. उपायुक्त प्रकाश वराडे, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, मनपाचे शिक्षणाधिकारी राजेन्द्र पुसेकर, वैद्यकिय प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स, विभाग प्रमुख तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

दिव्यांग योजना माहितीचे स्टॉल 

शिबिरात फक्त दिव्यांगत्व तपासणी व निदानच नाही तर दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर ‘दिव्यांग मतदार नोंदणी’, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’, बसेसमध्ये ‘प्रवासभाडे सवलत स्मार्ट कार्ड’, रेल्वेकरीता ‘प्रवासभाडे सवलत स्मार्ट कार्ड’ तसेच समाज विकास विभाग, म.न.पा., नागपूर यांच्या कल्याणकारी योजना आणि सक्षम, स्विकार, बौद्धिक दिव्यांग बालकांच्या पालकांची संघटना, संकल्प, बौद्धिक दिव्यांग बालकांच्या पालकांची संघटना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इत्यादी कल्याणकारी योजना तथा सोयी-सवलतीचा लाभ घेण्याकरीता त्यासंबंधिचे प्रचार-प्रसीद्धी स्टॉल देखील लावण्यात आलेले होते. २७२६ दिव्यांग व्यक्ति आणि त्यांच्या पालकांनी या स्टॉलला भेटी देऊन विविध योजनेंविषयी माहिती व लाभ करून घेतला. तसेच शिबिर स्थळी दिव्यांग बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता चित्रकला, नृत्यकला, पेंटिंग, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिके सुद्धा देण्यात आल्याने दिव्यांग व्यक्तींबरोबरच पालकांचा उत्साह वाढला

संघटनेतर्फे ई -रिक्षा, व्हील चेअर्सची व्यवस्था

दिव्यांग व्यक्तींना शिबीर स्थळी पोहचण्याकरीता अडचन होऊ नये म्हणून दिव्यांग व्यक्तींच्या संघटनेच्या सहकार्याने ई-रिक्षाची व्यवस्था आणि शिबिर ठिकाणी व्हील चेअर्स ची व्यवस्था ने-आन करण्याकरीता करण्यात आल्याने तसेच भोजनाची व्यवस्था श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारा संचालित सकस आहार वितरण ‘दिनदयाळ थाळी’ केंद्रामार्फत करण्यात आले होते आणि संपूर्ण व्यवस्थेबद्दल दिव्यांग व्यक्ति, त्यांचे पालक, दिव्यांग व्यक्तींच्या सक्रीय संघटना यांच्या पायाभूत सुविधाविषयी एकून १०४४ व्यक्तींच्या प्रतिक्रिया आणि सूचना लिखित स्वरुपात प्राप्त झाल्या.

दिव्यांग लाभार्थी नोंदणी तपशिल

विभाग निहाय दिव्यांग नोंदणी संख्या एकूण नोंदणी

अस्थिव्यंग (OH) – ४५०

मेडिसिन (Medicine)- २४२

अंध / अल्पदृष्टी (Blind/ LV) – १७६

कर्ण बधिर (HI) – १५९

बौद्धिक दिव्यांगता (ID) – ३९६

बालरोग (Pedia) – १८४

इतर (other) – ७४

एकूण नोंदणी – १६८१

कल्याणकारी योजना तथा सोयी-सवलतीचा लाभ घेण्याकरीता विविध स्टॉलला लाभार्थी भेट – १८२६ 

पात्र लाभार्थी – ९००

एकूण – २७२६

एकूण लाभार्थी – ४४०७

रक्त संबंधित (Blood Related) दिव्यांग लाभार्थी नोंदणी तपशिल

हीमोफीलिया – ४

सिकल सेल – ८०

थेलेसेमिया – १९

एकूण लाभार्थी – १०३

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महादुला बसपा इकाई ने मोटर साइकिल रैली निकालकर किया बाबासाहब का अभिवादन 

Fri Dec 9 , 2022
कोराडी :- बहुजन समाज पार्टी महादुला कोराडी इकाई की तरफ से भारत रत्न डा. बाबासाहब भीमराव आंबेडकर को वन्दन-अभिनंदन एवं अभिवादन किया गया। बसपा इकाई की तरफ से बाबासाहब के 66 वां महापरिनिर्वाण दिवस के उपलक्ष्य पर नीला झंडा वाईक शोभायात्रा निकाली गई यह शोभायात्रा महादुला-कोराडी के बुद्धविहारों की परिक्रमा करते हुए मुख्य राज्य महामार्ग होते हुए टी पाइंट होते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com