स्मार्ट सिटीची प्रलंबित कामांसाठी १६५ कोटीची निविदा

टेंडर श्योर पद्धतीने नेमणार कंत्राटदार : नागरिकांना मिळणार दिलासा

नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा आणि भांडेवाडी भागात रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी १६५ कोटीची निविदा काढण्यात आली असून यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या मागील बैठकीत शापूर्जी पालोनजी कंपनी प्रा. लिमिटेड सोबत स्मार्ट सिटीच्या विकास कामाचा करारनामा रद्द करून नवीन कंत्राटदार नेमणुकीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार नागपूर स्मार्ट सिटीतर्फे कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सर्व विकास कामे टेंडर श्योर (TENDERSURE) पद्धतीनुसार होणार आहे.

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे म्हणाले, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे पूर्व नागपुरातील पारडी, भांडेवाडी, पूनापूर आणि भारतवाडा भागात १,७३० एकरमध्ये टेंडर श्योर प्रकल्पाअंतर्गत रस्त्याची कामे सुरु आहेत. या विकास कामाची जबाबदारी शापूर्जी पालोनजी कंपनीला देण्यात आली होती. कंपनीतर्फे आतापर्यंत केवळ १२ किलोमीटर रस्त्याचे काम झाले आहे. कामात होत असलेला विलंब बघता शापूर्जी पालोनजी कंपनी सोबत केलेला करारनामा रद्द करण्यात आला आहे. आता प्रलंबित कामाची सहा भागात विभागणी करण्यात आली आहे. यामुळे काम वेळेवर होतील, असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे.

नवीन निविदा प्रक्रियेमध्ये पहिला पॅकेज रु. ६२.४८ कोटींचा, दुसरा पॅकेज रु. ३३.३८ कोटींचा, तिसरा पॅकेज रु. १४.७५ कोटींचा, चवथा पॅकेज रु. २१.७७ कोटींचा, पाचवा पॅकेज रु. २२.२३ कोटींचा आणि सहावा पॅकेज रु. १०.४४ कोटींचा निर्धारित करण्यात आलेला आहे. पाचवा पॅकेज पुलाच्या बांधकामाचा आहे आणि सहावा पॅकेज पाण्याच्या टाकींच्या अपु-या कामाकरिता काढण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, तेथील भौगोलिक परिस्थिती बघता सर्व रस्ते सिमेंटचे होणार आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाची भव्य वॉल पेंटिंग स्पर्धा शनिवारपासून

Fri Dec 2 , 2022
शहर सौंदर्यीकरणासाठी एकत्रित येण्याचे अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांचे आवाहन नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निम शासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेला (wallpainting competition) शनिवार ३ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. ही स्पर्धा ५ डिसेंबर २०२२ पर्यंत चालेल. स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत असून, ५५० हुन अधिक गट (५ ते ७ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com