– देवाने ज्यांचे आयुष्य टाकले अंधकार ते आजोबा म्हणतात प्रकाश व्हावा घरा घरात,वाढत्या वीजबिल विरोधात सामान्य नागरिकांची आवाज बनले बंटी शेळके
नागपूर :- आज बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यकारी अभियंता, तुळशीबाग झोन, महाल नागपुर वर पैदल मोर्चा काढण्यात आला. कारण नागपुर शहरातील विविध भागात अव्वाच्या सव्वा वीजबिल येत आहे. ज्या नागरिकांना पहले 700,800 बिल येत होते त्यांना 15000,20000 बिल आले आहे. व या बाबत महावितरण अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास उडवा उडविची उत्तरे देऊन बिल भरावेच लागेल असे धमकवून वापस पाठवतात.
काही नागरिकांना फ्कत 21 युनिट चे बिल 16000 आले तर काहीना 20000 त्यामुळे नागरिक बेहाल झाले आहे.तसेच वीज युनिट दर महावितरण ने कमी करावे कारण वाढती महागाई व वाढीव बिल या मुळे नागरिक त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे आंदोलनात 80 वर्षाचे वसंतराव गावंडे आजोबा जे दोन्ही डोळ्याने आंधळे होते ते लोकांच्या घरत प्रकाश व्हावा म्हणून आंदोलनात सहभागी झाले होते.आणि तसेच स्मार्ट मीटर ही संकल्पना सामान्य नागरिकास परवडणारी नही आहे . म्हणून स्मार्ट मीटर न लावता जुनेच मीटर रहुद्यावे ह्या मागण्या पूर्ण करण्याकरिता बंटी शेळके यांनी महावितरण झोन वर मोर्चा काढला होता. आणि लवकरात लवकर या समस्यांचे निवारण न झाल्यास अती उग्र आंदोलनाचा इशारा दिला.
आंदोलनात उषा खरबीकर, भरत गुप्ताजी,राजू महाजन,अशोक निखाडे,अब्दुल शकील ,यशवंत तुळशीकर,नयन तरवटकर, आकाश गुजर,इरफान काजी ,सागर चौहान,प्रफुल्ल ईजनकर, मोइज शेख,अमन लूटे,अभिषेक ढेंग्रे,कुणाल खडगी, स्वप्नील ढोके ,आयुष राऊत, उपस्थित होते.