सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 153 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (10) रोजी शोध पथकाने 153 प्रकरणांची नोंद करून 64100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणा-यांवर 3 प्रकरणांची नोंद करून रु 600 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 47 प्रकरणांची नोंद करून 18800 रुपयांची वसुली करण्यात आली.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून रु 5200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून रु 12500 दंड वसूल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 3000 दंड वसूल करण्यात आला.या व्यतिरिक्त इतर 45 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 9000 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 13 प्रकरणांमध्ये 13000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MoD signs Rs 667 crore contract for six Dornier-228 aircraft from HAL to further bolster operational capability of Indian Air Force

Sat Mar 11 , 2023
New Delhi :- Ministry of Defence, on March 10, 2023, signed a contract for procurement of six Dornier-228 aircraft for the Indian Air Force (IAF) from Hindustan Aeronautics Limited (HAL) at a cost of Rs 667 crore. The aircraft was used by IAF for Route Transport Role and communication duties. Subsequently, it has also been used for training of transport […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com