15000 नियमित पगार घेणारा ग्रा.पं. दिवाबत्ती कर्मचाऱ्याने विद्युत खांबावरील व तारांवरील झूटपांची छटाई करण्याचे काम सोडून स्वतःचे इतर कामे करण्यासाठी ठेवला 300 रुपये हप्त्याच्या खाजगी माणूस 

कोदामेंढी :- येथील ग्रामपंचायतचे नियमित दिवाबत्ती कर्मचारी म्हणून नथू सोनटक्के यांना गावातील एकूण लोकसंख्या फक्त 3829 व विद्युत खांबाची संख्या फक्त 296 असूनही गावातील व गावाबाहेरील रस्त्याच्या एका बाजूने असणाऱ्या पथदिव्याच्या देखभाल दुरुस्ती व पथदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे दहा वर्षांपूर्वीपासून नियुक्ती करण्यात आलेले आहे .मात्र ते ग्रामपंचायतीच्या पगार नियमित घेत असूनही विद्युत खांबावरील देखभाल दुरुस्ती नियमित करत नसल्याने गावाबाहेरील व काही गावातील खांबांवर व तारांवर झुडपे वाढलेली आहेत ,त्यामुळे तेथे पथदिवे लावण्यात येत नाही. त्यामुळे दिवाळी सुरू झाल्यानंतरही पथदिवे न लावल्यामुळे पथदिवे परिसरात व पथदिवे समोरील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यांनाही सावंगी रोडावरील दिवाळी सुरू होऊनही बंद पथदिव्यांच्या समस्येबाबत विचारपूस केली असता ,ते स्वतः नियमित कर्मचारी असून त्यांना त्या कामासाठी पुन्हा माणसाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जर नियमितपणे विद्युत खांब व तारांचे झुडूपे छटाई केली असती तर आज खांबावर पथदिवे लावण्यासाठी सोयीचे झाले असते ,असे त्यांना सांगितले असता त्यांनी मी नियमितपणे छटाई करत असल्याचे ते खोटे बोलले. मात्र त्यांच्या पगार फक्त 15000 असूनही त्यांनी गावातील व तारांवरील झुडूपांची छटाई करण्याचे काम सोडून दिवाबत्ती सकाळ संध्याकाळ बंद चालू करण्यासाठी व त्यांचे ग्रामपंचायतचे शिपाई चे काम करण्यासाठी गावातील खाजगी वसंता वाघमारे नामक व्यक्ती ठेवला आहे. याबाबत वाघमारे यांना विचारपूस केली असता त्यांनी ग्रामपंचायतचे दिवाबत्ती कर्मचारी नथू सोनटक्के त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना हप्त्यात दारू पाणी पाजतात व आठवडी बाजार गुरुवारी दिवशी भाजीपाला घेण्यासाठी आर्थिक मदत असा एकूण हप्त्याच्या तीनशे रुपये माझ्यावर खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पथदिवे खांबावर नियमित पथदिवे लावणे हे ग्रामपंचायतचे काम असूनही, ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून अधिकृत दिवाबत्ती कर नियमित वसूल करीत असूनही, या ग्रामपंचायत मध्ये मागील दहा वर्षांपूर्वीपासून नियमित दर महिन्याला पंधरा हजार रुपये पगार घेणारे दिवाबत्ती कर्मचारी असूनही खांबावर व तारावर वाढलेल्या झुडपांची छटाई करण्यासाठी माणसं भेटत नसल्याचे कारण सांगून पथदिवे खरेदी घोटाळे करणारे सरपंच आशिष बावनकुळे व येथील श्रेणी एक चे दिवाबत्ती कर्मचारी नथू सोनटक्के दिवाळी सुरू होऊनही सावंगी रोडवरील खांबांवर पथदिवे लावण्यास मागील आठ महिन्यापासून टाळाटाळ करीत असल्याने, संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासन विभागाने विशेष लक्ष देऊन लक्ष देऊन किंवा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून सावंगी रोडांवरील खांबावर पथदिवे तातडीने लावण्यात यावे ,अशी मागणी रोज पहाटे व सायंकाळी सावंगी रोडावरून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘…पण मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही’, संजय राऊतांच भाष्य

Wed Oct 30 , 2024
– 90 टक्के जागांवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे. उर्वरित जागांवर तिन्ही पक्ष एकत्र बसून, लोकांची नाराची दूर करण्याच प्रयत्न करु. निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याआधी एकत्र बसू” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “मविआला निवडणूका जिंकायच्या आहेत. त्यामुळे दोन-चार जागा मित्र पक्षाने जास्त लढल्या आणि जिंकल्या, तर इतर घटक पक्षांना वाईट वाटण्याचं कारण नाही. विदर्भात काँग्रेस पक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com