– शनिवार व रविवार झोन कार्यालय राहणार सुरू
नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून पूर्ण कर रक्कम नागपुर महानगरपालिकेत निधीत जमा केल्यास १५ टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ता धारकास १० टक्के सूट देण्यात येत आहे. योजनेचे अंतिम दोन दिवस शिल्लक असून, योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा व ऑनलाईन पेमेंट सुविधेचा देखील वापर जास्तीत जास्त करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
येत्या ३० जून २०२४ पूर्वी चालू आर्थिक वर्षाची पूर्ण कर रक्कम ऑनलाईन पेमेंट पद्धतीने नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण मालमत्ता कर रक्कमेवर १५ टक्के सूट दिली जाणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीने ३० जून २०२४ पुर्वी चालू आर्थिक वर्षाची पुर्ण कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास १० टक्के सूट दिली जाणार आहे. १ एप्रिलपासून ही योजना सुरू झालेली असून, नागरिकांचा देखील योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या सोयीकरिता शनिवारी आणि रविवारी देखील झोन कार्यालय सुरू राहणार असून, नागरिक ऑफलाईन देखील कर भरणा करू शकतात. तरी नागरिकांनी या विशेष सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन मनापाद्वारे करण्यात आले आहे.