सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 135 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (30) रोजी शोध पथकाने 135 प्रकरणांची नोंद करून 82,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 800/-रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 31 प्रकरणांची नोंद करून 41,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 47 प्रकरणांची नोंद करून 9,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 19 प्रकरणांची नोंद करून 19,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. आदीत्य अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत वामन हरी कोहाळ यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. स्टील इंडिया प्रा.लि. यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन नंदलाल अमुवाणी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच नितीन ढोलवाणी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबा ताजुद्दीन की छब्बीसवीं उत्साह से मनाई गई  

Fri Nov 1 , 2024
– ताजबाग दरगाह में हुई परचम कुशाई, दस्तारबंदी  नागपुर :- हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह की छब्बीसवीं शरीफ बुधवार को ताजबाग दरगाह परिसर में उत्साह के साथ मनाई गई. छब्बीसवीं पर दरगाह परिसर में परचम कुशाई की गई, इससे पहले ताजबाग ट्रस्ट कार्यालय में दस्तारबंदी की रस्म की गई, ट्रस्ट की तरफ से बाबा की मजार पर चादर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com