नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयास वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपये – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर :- नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीने रुग्ण सेवेकरिता यंत्रसामग्री, औषधे व सर्जिकल साहित्य या वैद्यकीय सुविधासाठी १३ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मेयो आणि मेडिकल रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी सध्या औषधे व यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच यासंदर्भात आणखी काही समस्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील.

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत

यासंदर्भातील उपप्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री सावंत बोलत होते.

यावेळी मंत्री सावंत म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध विभागांसह महानगरपालिका, जिल्हा परिषदेतील औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात “महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहे. आरोग्य सहसंचालक दर्जाचा व्यवस्थापक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे आहेत. राज्य सरकारचे विविध विभाग आपापल्या गरजेनुसार औषधे, वैद्यकीय उपकरणे, साहित्यसामग्री आदींची खरेदी करतील.

वेगवेगळे विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्रकारचे औषधे, उपकरणे वेगवेगळ्या दरात खरेदी करत होते. प्राधिकरणामुळे एकात्मिक पद्धतीने खरेदी करता येणार असल्यामुळे अविलंब खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामळे यापुढील औषध खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार असल्याचे मंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेसाठी जमा रक्कम उमेदवारांना परत करण्याची कार्यवाही सुरू - ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन

Sat Dec 9 , 2023
नागपूर :- ग्राम विकास विभागाची मार्च,२०१९ व ऑगस्ट, २०२१ मध्ये होणारी पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, डॉ.मनीषा कायंदे आणि विरोधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com