कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 13 उमेदवार रिंगणात

– 12 उमेदवारांनी उमदेवारी अर्ज मागे घेतले

नवी मुंबई :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक 7 जून, 2024 पर्यंत स्वीकारण्यात आलेल्या एकूण 25 अर्ज नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर 12 अर्ज नामनिर्देशन मागे घेण्यात आले असून निवडणूकीच्या रिंगणात 13 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार अर्जांची छाननी झाल्यानंतर आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत छाननी दरम्यान एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून 1) ॲङ घोन्साल्वीस जिमीम मॅतेस 2) निलिमा निरंजन डावखरे 3) केदार शिवकुमार काळे 4) संजय भाऊराव मोरे 5) अस्मा जावेद चिखलेकर, 6) डॉ.प्रकाश पाडूरंग भांगरथ 7) अंकिता कुलदीप वर्तक, 8) अमित जयसिंग सारिया 9) किशोर ओतरमल जैन, 10) डॉ.भगवान अभिमानसिंग रजपूत 11) प्रा.राजेश संभाजी सोनावणे, 12) अमोल रतन गौतम जगताप असे एकूण 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13 झाली आहे. ते पुढील प्रमाणे 1) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस 2) डावखरे निरंजन वसंत, भारतीय जनता पार्टी 3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना 4) अमोल अनंत पवार, अपक्ष 5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष 6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष 7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष 8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष 9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष 10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष 11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष 12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष 13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती,अपक्ष असे आहेत.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार 26 जून 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) अमोल यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'मिशन पुना आकी': दुर्गम भागात आधार-जन्म दाखला देण्यासाठी विशेष मोहिम

Thu Jun 13 , 2024
· पंचायत समिती भामरागडचा उपक्रम गडचिरोली :-  गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात नागरिकांना आधार कार्ड व जन्म दाखला जागेवरच उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता तसेच महिलांच्या आरोग्यावर जनजागृती व्हावी याकरिता पंचायत समिती भामरागड तर्फे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत ‘मिशन पुना आकी’ म्हणजेच ‘मिशन नवी पालवी/सुरवात’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. काय आहे ‘मिशन पुना आकी’? भामरागड तालुक्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com