विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत १३ शिबिरे, विविध शासकीय योजनांचा मिळणार महिती व लाभ

– निःशुल्क आरोग्य तपासणीचा घेता येणार लाभ  

– लकी ड्रॉ द्वारे मिळणार आकर्षक बक्षिसे

चंद्रपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा चंद्रपूर शहरात लवकरच पोहोचणार असुन येत्या गुरुवार १८ जानेवारी पासुन चंद्रपूर शहरात ७ दिवसीय संकल्प यात्रेस प्रारंभ होणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन अर्थात रथ मनपाच्या तिन्ही झोन मध्ये फिरणार असून, विविध शिबीरे घेत नागरिकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविणार आहे. चंद्रपूर मनपाद्वारे १३ जागांवर शिबिरे आयोजित केली गेली असुन यासाठी रूट मॅप सुद्धा बनविण्यात आले आहे. या गुरुवारी १८ तारखेला मूल रोड इंदिरा नगर येथील मनपा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९:३० ते १२:२० वाजेपर्यंत तर दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत मनपा झोन कार्यालय बंगाली कॅम्प येथे शिबीर घेण्यात येणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांत पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जात आहे.

मनपाद्वारे आधार नुतनीकरण (अपडेशन ),आयुष्मान ई गोल्ड कार्ड,प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ( पीएम स्वनिधी योजना ),स्वनिधी से समृद्धी योजना,पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत असुन योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले जातात आहे. त्याचप्रमाणे शिबिरांमध्ये असंसर्गजन्य आजार यांचे निदान व उपचार देखील दिल्या जाणार आहेत. यानंतर होणाऱ्या शिबीराची माहिती मनपाचे संकेत स्थळ आणि सामाजिक माध्यमांवर उपलब्ध राहणार असल्याचे मनपाद्वारे कळविण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगा – योजनांचा लाभ घेण्यास नागरिकांनाही शिबिरात भेट देतांना आधारकार्ड,राशन कार्ड,बँक पासबुक,ओळखपत्र, रहिवासी पुरावा इत्यादी कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक राहील.

लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे – शिबिरास भेट देऊन लाभ घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ द्वारे स्मार्ट फोन,स्मार्ट वॉच,इअर फोन,ब्लूटूथ स्पीकर इत्यादी बक्षिसे दिली जाणार आहेत.

सर्व शिबिरांची वेळ –

१. प्रथम शिबीर सकाळी ९:३० ते १२:२० वाजेपर्यंत

२. दुसरे शिबीर दुपारी २:३० ते ५:३० वाजेपर्यंत

केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी प्राप्त होत असल्याने चंद्रपूर शहरातील समस्त नागरिकांनी मनपाद्वारे घेण्यात येणाऱ्या १३ शिबिरांस भेट देऊन या विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घ्यावा – आयुक्त विपीन पालीवाल

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभप्रसंगी पहिल्या भारत जोडो यात्रेवर लिहिलेल्या पुस्तकाचे नाना पटोले यांच्या हस्ते विमोचन

Tue Jan 16 , 2024
मुंबई :-12 जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन दादर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन टिळक भवण मुंबई ईथे करण्यात आले होते. भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित या कार्यक्रमात पहिल्या भारत जोडो यात्रेवर लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाचे विमोचन ही करण्यात आले. महात्मा बनण्याच्या दिशेने, प्रथम भारत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!