बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची 1 मार्च पासून

नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा 1 मार्च 2024 पासून घेण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान आणि माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा 20 मार्च ते 23 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत तर प्रात्याक्षिक, श्रेणी,तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. परिक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Wrestling - Bronze medal to Nandini Salokhe in women's wrestling category

Fri Nov 3 , 2023
Panaji :- Maharashtra’s Nandini Salokhe won a bronze medal in the 50 kg wrestling category at the National Games. In the first round of this group, she defeated Delhi’s Deepika 6-0. She followed that up with a decisive win over Reshmi Kumari of Bihar.But in the semi-finals, she had to accept defeat from Shivani Pawar, a player from Madhya Pradesh. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com