सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 123 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (14) रोजी शोध पथकाने 123 प्रकरणांची नोंद करून 68200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 1 प्रकरणांची नोंद करून रु 200 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6800 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 1700 रुपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु 18500 दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर 45 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 9000 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 24 प्रकरणांमध्ये 24000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

AIBA All India Business Women's Association: Celebrating Women's Victories 

Wed Feb 15 , 2023
Women Entrepreneurs Thriving In The Online World from the Comfort of Their Homes  New Delhi :-Gone are the days when women were limited to household chores and were not allowed to pursue their professional goals. With the advent of technology and the internet, women entrepreneurs are now able to start and run their businesses from the comfort of their homes. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com