सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 112 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 17) रोजी उपद्रव शोध पथकाने 112 प्रकरणांची नोंद करून 55 हजार 900 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 33 प्रकरणांची नोंद करून 13 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 14 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 39 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करुन 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी, उघड्यावर मलमुत्र विर्सजन केल्यास 01 प्रकरणांची नोंद करुन 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता. 17) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत पौनीकर किराणा शॉप रानी दुर्गावती चौक यांच्या कडुन 5 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मिलीन कुलकर्णी अजनी रोड, अभिनव निंबेकर दिनद्याल नगर व भाऊसाहेब शेठे अत्रे ले-आऊट रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याबाबत या तीन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 15 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत आनंदम् रेस्टोरेंट अमरावती रोड अनधिकृत ठिकाणी हॉटेलचा कचरा टाकल्याबाबत यांच्याकडून 5 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत बचपन स्कुल न्यु मनीष नगर व नेहरुनगर झोन अंतर्गत वाघे क्लासेस परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्याबाबत या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत शिवम कन्स्ट्रक्शन विद्या नगर बांधकामाचा कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबात 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत डोमिनोस एच.बी.टाऊन यांच्याकडुन अनधिकृत ठिकाणी कचरा टाकल्यास 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत मुसबिर अहमद सिद्धीकी नवाज नगर फर्निचरचा कचरा रस्त्यावर टाकल्याबाबत 5 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 10 प्रकरणाची नोंद करून 55 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तस्करी केले जात असलेले 11 किलो सोने आणि सिगारेट, विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने केलेल्या विविध कारवायांमध्ये प्रवाशांकडून जप्त,तीन जणांना अटक

Sat May 18 , 2024
मुंबई :- विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने 13 – 16 मे 2024 या कालावधीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या 27 कारवायांमध्ये 7.16 कोटी रुपये मूल्याचे 11.39 किलोहून अधिक सोने आणि सिगारेटी जप्त केल्या. मेणात लपवलेले सोन्याचे बारीक कण, कच्चे दागिने, रोडियम प्लेटेड पैंजणे आणि सोन्याच्या वड्या अशा विविध स्वरूपात जप्त केलेले सोने आढळले. सामानासोबत, गुदाशयात, बुरख्याखाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!