संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 टोल फ्री क्रमांक

यवतमाळ :- विविध प्रकारचे संकटग्रस्त, अत्याचारग्रस्त, हरवलेल्या, मदतीची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी १०९८ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. बालकांना मदतीची आवश्यकता असल्यास या हेल्पलाईचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, या करिता कोठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशावेळी संकटग्रस्त बालकांना सदर हेल्पलाईन क्रमांक सहाय्यता उपलब्ध करुन देणार आहे.

संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरिता भारत सरकारचा महिला व बाल विकास तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ० ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली आहे.

सदर सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना चोवीस बाय सात हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. संकटग्रस्त बालके दिसल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून अशा बालकांना मदत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेशोत्सव मंडळांनी पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

Fri Aug 30 , 2024
– राज्यस्तरावर ५ लाखाचा पहिला पुरस्कार – स्पर्धेत सहभागासाठी केवळ २ दिवस शिल्लक यवतमाळ :- राज्यात गेल्यावर्षी सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षी देखील गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड सांस्कृतिक कार्यक्रम, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!