पाच दिवसात 107 वीजचो-या उघडकीस

नागपूर :- महावितरणच्या नागपूर शहर मंडलांतर्गत वीजचोरीविरोधात संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकांकडून संयुक्त मोहिम सुरु करण्यात आली असून या मोहीमेत अवघ्या पाच दिवसांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये सुमारे 31.65 लाख मुल्याच्या तब्बल 107 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय कलम 126 अन्वये सुमारे 1.3 लाख मुल्याच्या 5 ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळुन आली आहे.नागपूर शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील संघर्ष नगर. लश्करीबाग व यशोधरा नगर, महाल विभागातील  ताजबाग व हसनबाग, गांधीबाग विभागातील मोमीनपुरा व अन्सार नगर आणि खोग्रेसनगर विभागातील जयताळा, हुडकेश्वर या भागातील वीज हानी अधिक असलेल्या वाहिन्यांवर 4 सप्टेंबर 2023 पासून ही मोहीम कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली अहे. महावितरणचे प्रदेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या नेतृत्वात या विभागाचे कार्यकारी अभियंता रजेश घाटोले, समीर टेकाडे, राहुल जीवतोडे आणि हेमराज ढोके यांच्यासह या भागातील उपविभागातील सर्व अतिरिक्त कार्यकारी अभियंते आणि सहायक अभियंते आणि त्यांचे तांत्रिक कर्मचा-यांसोबत्च गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि नागपूर शहर व नागपूर ग्रामिण मंडलाचे भरारी पथकांचा समावेश असून दिवसेंदिवस वीजचोरी विरोधातील ही मोहीम अधिक आक्रमक करणार असल्याची माहीती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.

याभागातील वीज वाहिन्यांवरील वीजहानीचे प्रमाण बघता महावितरणने या भागात वीजचोरीविरोधात धडक मोहीम सुरु केली आहे.  महावितरणच्या पथकांनी या भागातील अनेक वीज जोडण्यांची तपासणी केली. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये सुमारे 31.65 लाख मुल्याच्या तब्बल 107 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय कलम 126 अन्वये सुमारे 1.3 लाख मुल्याच्या 5 ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळुन आली आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकांना वीजचोरीपोटीचा दंड भरण्याची सुचना करण्यात आली आहे. वीज चोरी पथकाच्या कारवाईमुळे चोरी करणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. हे पथक परिसरात सतत फिरत आहे. वीजचोरी अधिक असल्याने या भागातील वीज वाहिन्यांवर तांत्रिक व वाणिज्यीक हानी वाढून त्याचा त्रास प्रामाणिक वीज ग्राहकांना होतो याशिवाय महावितरणला आर्थिक फ़टका देखील बसतो. याशिवाय या वाहिन्यांवरील वीजहानीचे प्रमाण आटोक्याबाहेर गेली तर भविष्यात या वाहिन्यांवरील ग्राहकांना भारनियमनाला देखील सामोरे जाण्याच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्राहकांनी वीजेची अधिकृत जोडणी घेऊनच कायदेशीर वीज वापर करावा आणि आपल्या वीजबिलाचा भरणा देखील नियमितपणे करावा, असे आवाहन देखील दिलीप दोडके यांनी केले आहे.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रदूषणमुक्त निळया नभासाठी प्रयत्न करा - मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी

Fri Sep 8 , 2023
-‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लु स्काइज’ दिवस मनपाने केला साजरा नागपूर :- मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध अंबाझरी तलावात येथे मानवी आरोग्यसह पर्यावरणाचा अविभाज्य अंग असणारे प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींसाठी गुरुवार (ता.७) रोजी “इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लु स्काइज” हा दिवस साजरा करण्यात आला. प्रदूषण मुक्त वातावरण आणि निळे आकाश ही सर्वसाठी असून आपण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com