१०३ पीओपी मूर्ती जप्त एक लाख ४० हजार रुपये दंड वसूल ; मनपाच्या कारवाईला गती

नागपूर :- पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. मंगळवारी (ता.१२) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १०३ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपायुक्त श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

प्रतिबंधित पीओपी मूर्तीच्या विक्रीवर आळा बसावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने मूर्ती विक्री स्थळांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे जवान, पारंपरिक मूर्तिकार संघाचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांच्याद्वारे संयुक्तरित्या मूर्ती तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. पारंपरिक मूर्तिकार संघाच्या प्रतिनिधींकडून मूर्तीची तपासणी करून ती मातीची अथवा पीओपीची असल्याची शहानिशा केली जाते. पीओपी मूर्ती आढळताच तात्काळ मूर्ती जप्त करून संबंधितांवर १०००० रुपये दंडाची कारवाई केली जाते.

याअंतर्गत मंगळवारी (ता.१२) टेलिफोन एक्सचेंज चौक, भावसार चौक, चितारओळी या भागातील मूर्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ ठिकाणी पीओपी मूर्तींची विक्री होत असल्याचे दिसून आले. या सर्व विक्रेत्यांवर कारवाई करीत एकूण १०३ मूर्ती जप्त करण्यात आल्या व प्रत्येकी १०००० रुपये याप्रमाणे एकूण १४०००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, गांधीबाग झोनचे सुरेश खरे, नवकिसन शेंडे, लोकेश बासलवार, आशीनगर झोनचे रोशन जांभुळकर, उपद्रव शोध पथक सिव्हीलचे संजय खंडारे, गणेशपेठ पोलीसे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेद्र आंभोरे यांच्या चमूने ही धडक कारवाई केली. यावेळी पारंपारिक मुर्तिकार श्री सुरेश पाठक व चंदन प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते.

यांच्यावर झाली कारवाई

रोशन मूर्ती भांडार टेलिफोन एक्सचेंज चौक (२४ मूर्ती), निधी गणेश मूर्ती आर्ट भावसार चौक (४ मूर्ती), स्वामी मूर्ती भांडार भावसार चौक (४ मूर्ती), अमूल्य आर्ट भावसार चौक (७ मूर्ती), गणेश मूर्ती भांडार भावसार चौक (५ मूर्ती), ज्योती गणेश भांडार भावसार चौक (२ मूर्ती), भावसार मंदिर भावसार चौक (१४ मूर्ती), लोणारे मूर्ती भांडार भावसार चौक (१४ मूर्ती), शाहु मूर्ती भांडार चितारओळी महाल (४ मूर्ती), सोनू मूर्ती भांडार चितारओळी महाल (३ मूर्ती), पंजाब लोणारे भावसार चौक (९ मूर्ती), स्वामी मूर्ती भांडार भावसार चौक (५ मूर्ती), विनोद गुप्ता भावसार चौक (३ मूर्ती), चहांदे मूर्ती भांडार न्यू पोलिस स्टेशन पाचपावली (५ मूर्ती).

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Thu Sep 14 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.12) 20 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. माँ अन्नपुर्णा हॅपी फुड, मानेवाडा रोड, नागपूर यांच्यावर हॉटेलचा कचरा नाल्यात टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. माँ अन्नपुर्णा हॅपी फुड, बेसा रोड, नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com