३५५ लाभार्थ्यांनी घेतला रुपये २० हजार कर्जाचा लाभ,३ लाभार्थ्यांनी घेतला ५०,०००/- हजार कर्जाचा लाभ
१०६१ लाभार्थी २० हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र
चंद्रपूर :- प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ २३८८ लाभार्थ्यांनी घेतला आहे. यातील ३५५ लाभार्थ्यांनी कर्ज परत करून रुपये २० हजार कर्जाचा लाभ घेतला,३ लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे कर्ज प्राप्त झाले असुन इतर १०६१ लाभार्थी २० हजार रुपये कर्जासाठी पात्र झाले आहेत.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.
योजनेअंतर्गत महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत २३८८ पथविक्रेत्यांना १०,०००/- रुपये कर्जाचा लाभ मिळाला असुन यातील १०६१ लाभार्थ्यांनी कर्ज परत केले आहे. यापैकी ३५५ लाभार्थ्यांनी २० हजार रुपयांचे अतिरिक्त कर्जाचा लाभ घेतला आहे. तर उर्वरित अतिरिक्त कर्जासाठी पात्र झाले आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु आहे. शहरातील पथविक्रेत्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केद्र /नागरी सुविधा केंद्र) व ग्राहक सेवा केंद्र येथे ऑनलाईन अर्ज करावेत किंवा महानगरपालिकेच्या नागरी उपजीविका केंद्राकडे ( जुबली हायस्कूल समोर ) अर्ज करता येईल. तरी शहरातील पथविक्रेते यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपुर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.