नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.५) रोजी ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात कारवाई करीत रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी १० हजारांचा दंड वसूल केला.
नेहरूनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून इतवारी हॉस्पिटल मागील आशीर्वाद नगर येथील सुरेश मून यांच्यावर कारवाई करीत 10 हजार रुपये दंड वसूल केला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कॉटन मार्केट स्थित गुप्ता खोवा भंडार यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच नरेंद्र नगर स्थित मेड प्लस दुकानावर विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात लावल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय गांधीबाग झोन अंतर्गत हंसापुरी येथील श्री डेरी यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर सतरंजीपुरा झोन अंतर्गत इतवारी येथील पौनीकर किराणा स्टोर यांच्यावर कारवाई करीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.