– कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या शुभहस्ते हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील १० विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील आयआयटीद्वारे घेण्यात येणाऱ्या गेट या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत पात्र ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) २०२५ मध्ये यशस्वीरित्या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या शुभहस्ते मंगळवार, दि. २५ मार्च २०२५ रोजी करण्यात आला.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभा कक्षात पार पडलेल्या गौरव कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्यासह कुलसचिव सचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, व्यवस्थापन परिषद सदस्य वामन तुर्के, औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पुराणिक, माजी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, माजी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद खेडेकर, डॉ. प्रफुल्ल साबळे, डॉ. रिता वडेतवार यांची उपस्थिती होती. गेट २०२५ मध्ये पात्र ठरलेल्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक पुष्पराज तिवारी हा विद्यार्थी जैवतंत्रज्ञान तसेच जैवविज्ञान या दोन्ही प्रकारात पात्र ठरला आहे. या सोबतच राहुल हरेश मोटवानी या विद्यार्थ्याने २०२ रँक प्राप्त केली तर पात्र ठरलेल्या अन्य विद्यार्थ्यांमध्ये चिंतन नितीन फिरके, मोहम्मद अमन आरिफ कुरेशी, प्रेरणा कृष्णा कटारे, खुशबू गणेश मेवलिया, नारायणी विलास कावळे, अमिषा बंडोले, आदित्य दिलीप मोहोड, मधुरा चौबे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना गेट परीक्षा पात्र ठरण्याचा फायदा आयआयटी सारख्या नामांकित राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी होणार आहे. त्याचप्रमाणे पदव्युतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशा सोबतच सर्व संशोधन शिष्यवृत्तीसाठी देखील विद्यार्थी पात्र ठरले आहे. यावर्षी आयआयटी रूरकी यांच्या वतीने गेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. गेट परीक्षा १६ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली तर १९ मार्च रोजी या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला.