सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख,जखमींवर शासकीय खर्चाने उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपाचे रामजी गौतम आज नागपुरात 

Wed Jul 12 , 2023
नागपूर :- बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य केंद्रीय प्रभारी व राज्यसभा खासदार रामजी गौतम हे आज नागपुरात होणाऱ्या बसपाच्या प्रदेश स्तरीय कार्यकारणी बैठकीसाठी येत आहेत. ही बैठक 12 जुलै ला दुपारी 12 वाजता रवीभवन येथे होणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेशचे दुसरे केंद्रीय प्रभारी भीम राजभर, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजने, महाराष्ट्र प्रदेशचे स्थानिक प्रभारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com