संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- कांद्री परिसरातील वाईन शाॅप बियर बार जवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कारचे भरदिवसा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडुन सिट वरील दोन ब्यॅग चोरून १ लाख २२ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच खळखळ उडाली आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरवार (दि.१३) डिसेंबर ला सकाळी ११ वाजता दरम्यान तनुश चंद्रशेखर कांबळे वय २७ वर्ष रा. नागपुर यांचे कँम्पनीचे रिजनल मॅनेजर राहुल सिंग मानसिंग हजेरी वय ३७ रा. इंदोरा नागपुर हे रेनाॅल्ड किंगर कार क्र.एमएच २६ बी एक्स ७१६७ कार ने दोघेही रामटेक येथे जाण्यास निघाले. दुपारी १२ वाजता दरम्यान मनसर येथे महालक्ष्मी ट्रेडर्स येथे थांबुन सिमेंट सेल्स बाबत चर्चा करून १५ मिनिटांनी रामटेक साठी निघाले. रामटेक ला जावुन चकोले ट्रेड र्स ला भेट देऊन रामटेक गडावर फिरायला गेले. त्या नंतर दुपारी २ वाजता दरम्यान नेहा ट्रेडर्स रामटेक येथे गेले व सिमेंट सेल्स बाबत चर्चा करून नागपुर जाण्या स निघत असतांना नेहा ट्रेडर्सचा मालक राजेश चौकसे यांनी सिमेंट बिलाचे १ लाख रूपय डिस्ट्रीब्युटर ला देण्यासाठी तनुश जवळ दिले व ते पैसे तनुशने काॅलेज ब्याग मध्ये कारचा मागचा सिटवर लॅपटॉप ब्यागच्या बाजुला ठेऊन दुपारी २.३० वाजता दोघेही नागपुर ला जाण्यास निघाले. कांन्द्री कन्हान येथे नाश्ता करायचा असल्याने राष्ट्रीय महामार्गा वरील वाईन शाँप बियर बार जवळ रोड चा कडेला गाडी उभी व लाँक करून दोघे ही रोड चा पलीकडे ओम रेस्टाॅरेंट येथे नाश्ता करायला गेले. दोघेही नाश्ता करून १५ मिनिटांनी कार जवळ आले. तेव्हा कार चा समोरील चक्का पंचर झालेला दिसला व मागिल डाव्या बाजुचा काच फोडले ला दिसला व कार चा मागिल सिट वर ठेवलेले एक लाख रुपये आणि एव्हीटा कंपनीचा लॅपटॉप या दोन्ही ब्याग दिसुन आल्या नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यां नी वाहनाचा समोरील चाक पंक्चर करून व मागिल खिडकीचे काच फोडुन सिट वरील १ लाख रूपये ठेव लेली ब्याग व एव्हीटा कँम्पनी चा लॅपटॉप ब्याग किंमत २२,००० रुपये असा एकुण १,२२,००० रुपयांचा मुद्दे माल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी तनुश कांबळे यांचे तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ७७९/२०२३ कलम ३७९, ४२७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहा. फौजदार गणेश पाल, सचिन वेळेकर हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.