उमरेड :- अंतर्गत शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा या गणपतीची विसर्जन मिरवणुक उमरेड शहरात आयोजीत केलेली होती. शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा याची मिरवणुक ही श्रीकृष्ण मंदिर इतवारीपेठ उमरेड येथे सुरु असतांना २०.३० वा. दरम्यान मिरवणुक बघण्याकरिता तसेच ढोलताशा बघण्याकरीता लोकांची गर्दी जमलेली होती. त्या दरम्यान शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा एका कार्यकर्त्याने जवळच असलेल्या कंस्ट्रक्शन बिल्डींगवर जावुन फटाका फोडला असता फटाका वर न जाता खाली आला व डोलताशा पथकाच्या जवळ फुटल्याने तेथे बघणा-या नमुद महिला व ढोल ताशा वाजविणा-या ०७ महिला जखमी झाल्या आहे. ०७ महिलांपैकी ०४ महिला किरकोळ जख्मी असुन ०३ महिला या गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमी महिलांचे श्री हॉस्पीटल सक्करदरा नागपूर येथे उपचाराकरीता दाखल केलेले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा यांचे अध्यक्ष प्रशांत अनिलकुमार जयस्वाल, वय ४२ वर्ष रा. उमरेड व फटाका फोडणारा इसम शुभम खेमराज नंदनवार वय २८ वर्ष, रा. दोन्ही रा. उमरेड यांच्या विरुध्द पोस्टे उमरेड येथे भा. न्याय. संहिता कलम २८८, १२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे) यांनी श्री हॉस्पीटल सक्करदरा नागपूर येथे जावुन गंभीर जखमी महिलांची भेट घेतली असुन तसेच डॉक्टरांना जखमींच्या तब्येतीबाबत विचारपुस केली. तसेच पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे) यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळ आणि पोस्टे उमरेड येथे भेट दिली, भेटी दरम्यान त्यांनी सदर गुन्हयामध्ये कलम १२५(b) भा.न्या.सं हे कलमवाढ करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक यांनी ठाणेदार उमरेड यांना सुचना दिल्या. कलम १२५ (b) भा.न्या.सं मध्ये ०३ वर्ग कारावास तसेच १०,०००/- रु. दंड अशी शिक्षा आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि कार्तिक सोनटक्के हे करीत आहे. जखमींचा पुढील वैद्यकीय उपचार ग्रामीण रूग्णालय उमरेड व श्री हॉस्पीटल सक्करदरा येथे उपचार सुरू असुन शिवस्नेह गणेश उत्सव मंडळाचा उमरेडचा राजा यांचे अध्यक्ष प्रशांत अनिलकुमार जयस्वाल, वय ४२ वर्ष रा. उमरेड व फटाका फोडणारा इसम शुभम खेमराज नंदनवार वय २८ वर्ष, रा. दोन्ही रा. उमरेड यांना उमरेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर अति. कार्यभार उमरेड विभाग दीपक अग्रवाल (भापोसे.) यांचे मार्गदर्शनात पोस्टे उमरेडचे ठाणेदार पोनि अनिल राउत, पोउपनि कार्तिक सोनटक्के यांनी पार पाडली.