वाहन चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत देवगडे आटा चक्की जवळ, तिवारी तेलीपूरा, पेवठा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी विनोद भाऊराव वराडे वय ५१ वर्ष यांनी त्यांची हिरो होन्डा स्लेंडर गाडी क. एम.एच ३१ डी.एन २०९२ ही लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शांतीनगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ ये अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपासाकरून दोन आरोपींना निष्षन केले, व त्यांना ईतवारी मालधक्का येथुन वाहनासह ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी त्याचे नावे १) नेहाल शेख आबीद शेख वय २१ वर्ष रा. गांधीपुतळा जवळ, सतरंजीपूरा, लकडगंज, नागपूर २) आर्यन राजन भैसारे वय २२ वर्ष रा. खलासी लाईन, सदर, नगपूर असे सांगीतले. आरोपींना त्यांचे जवळील वाहना बाबत विचारले असता त्यांनी संगणमत करून वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन वर नमुद गुन्हयातील वाहन तसेच पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतुन चोरी केलेली हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी क. एम.एच ४९ ए. डोड ०६२६, तसेच लोहमार्ग नागपूर येथील चोरीचे गुन्हयातील अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ३१ डी.जे २९८४ असे एकुण तिन वाहने चोरी केल्याची कबुली दिली आरोपोंचे ताब्यातून तिन्ही वाहने जप्त करण्यात येवुन तिन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. आरोपींना मुद्देमालसह पुढील कारवाई करीता शांतीनगर पोलीसांने ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांचोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि, मधुकर काठोके, सफी, दशरथ मिश्रा, पोहवा, विजय श्रीवास, भुषण भगत, संतोषसिंह ठाकुर, पोअं. जितेश रेड्डी, दिपक दासरवार, कपिल ताडकर, दिपक लाकडे, विशाल रोकडे व प्रमोद देशभ्रतार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस अटक

Mon Oct 21 , 2024
नागपूर :- फिर्यादी प्रितेश अर्जुनदास नागोसे वय ३८ वर्ष रा. प्लॉट नं. १६१, दत्तनगर, कळमण्णा, नागपूर हे मित्रांसह जेवन करून एकटे त्यांचे मोपेड क. एम.एच ४९ ५१५० ने परी जात असता, पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत कामठी ओव्हर ब्रिज नंतर कळमणा रोडवरील डावे बाजुला असलेल्या झाडी झूडपामध्ये लघुशंके करीता थांबले असता, दोन अनोळखी ईसमांनी तेथे येवुन फिर्यादीस येथुन महिला येणे-जाणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com