जिल्हा परिषद भंडारा पदभरती परीक्षा 15 ऑक्टोबरपासून, आयबीपीएसने दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार परीक्षा

भंडारा :-  जिल्हा परिषद, भंडारा येथील विविध पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात काही पदांची परीक्षा झाली असून आता आयबिपिएस संस्थेने दिलेल्या वेळापत्रकानुसार पुढील संवर्गाचे वेळापत्रक प्राप्त झालेले आहे.त्यासाठी 15 ऑक्टोबर, रोजी कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रीकल,17 ऑक्टोबर रोजी वायरमन, फिटर व पशुधन पर्यवेक्षक, 18 ऑक्टोबर, रोजी सुपरवायझर, 21 व 23 ऑक्टोबर, रोजी कनिष्ठ अभियंता सिव्हिल बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा,तसेच 22 ऑक्टोबर, रोजी औषध निर्माण अधिकारी पदभरती होणार आहे.

त्यासाठी संवर्गाच्या परिक्षेकरिता केंद्र,निश्चित करण्यात आली आहे.यापैकी उमेदवारास कोणते केंद्र,निश्चित करुन देण्यात आले आहे.याची माहिती उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर नमुद करण्यात आलेली आहे. तसेच परिक्षा केंद्र,असलेल्या गावांचे नांव व परिक्षा केंद्राचे नाव व पत्ता खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भंडारा साईराम प्रा. शासकीय औद्योगिक संस्था, भंडारा, तुमसर स्व.अजय पार्डी मेमो प्रायव्हेट ‘शासकीय औद्योगिक संस्था, हसरा (तुमसर) नागपूर, आयओएन डिजिटल झोन वाडी टेकग्रेसर सॉफ्ट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड जी.-4/1/बी एमआयडीसी हिंगणा वाडी रोड ऑफ मुन्ची मोर्टस बि.एम. डब्लू शोरुम नागपूर ,मॉडर्न महाविद्यालय एमआयडीसी टि -पॉईंट वाडी ऑफ राहुल हॉटेल अमरावती रोड, वाडी ,नागपूर , या केंद्रावर परीक्षा होणार आहे.

तसेच उर्वरीत संवर्गाच्या परिक्षेचे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर प्रसिध्दी करण्यात येईल.तथापी उमेदवारांनी जिल्हा परिषद भंडाराच्या www.bhandarazp.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घ्यावी.

संवर्गाच्या परिक्षा दिनांक 15 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर,22 ऑक्टोबर, तसेच 23 ऑक्टोबर,2023 पर्यत आहेत.त्याकरिता परिक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.त्यामुळे उमेदवारांनी त्यांची प्रत छापून घेऊन त्यातील सूचना प्रमाणे पुढील कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा निवड समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग ,जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुत्तेमवार तात्काळ माफी मागा अन्यथा थोबाड रंगवू - ऍड. धर्मपाल मेश्राम 

Fri Oct 13 , 2023
नागपूर :- काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अत्यंत घृणीत वक्तव्य केले त्याचा तीव्र शब्दांत निषेध निंदवितो. बाबासाहेबांना आणि संविधानावर आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा अपमान आहे. केवळ मतांसाठी बाबासाहेब आणि आंबेडकरी समुदायाचा वापर करणारी काँग्रेस आणि मुत्तेमवारांची मानसिकता यातून दिसत आहे. मुत्तेमवार आपल्या या घृणीत वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागा अन्यथा तुमचे तोंड आणि थोबाड दोन्ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!