संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 21:-महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या प्रदेश अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच लाखाहून अधिक मते घेणारे कुणाल राऊत यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कामठी नगरीत प्रथमागमन होताच कांग्रेस चे माजी महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या वतीने कुणाल राऊत यांचा सुरेश भोयर यांच्या दालनात जंगी स्वागत करीत शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .या आनंदाच्या प्रसंगी नागपूर जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस महासचिव अनुराग भोयर, युवक कांग्रेस चे माजी महाराष्ट्र प्रदेश महासचिव मो इर्शाद, युवक कांग्रेस चे कामठी मौदा विधानसभा अध्यक्ष सलामत अली, नगरसेवक नीरज लोणारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कुणाल राऊत निवडून आल्याने युवक कांग्रेस मध्ये आनंदाचे वातावरण असून याच पाश्वरभूमीवर येथील युवक कांग्रेस , एनएसयुआय, कांग्रेस कमिटी , महिला कांग्रेस,कांग्रेस सेवादल आदी पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून नवनिर्वाचित कुणाल राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
युवक कांग्रेस चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांचे जंगी स्वागत
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com