संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना कळवा या हेतूने दिवाळी निमित्त दिनांक ११ते १६ नोव्हेंबर या दरम्यान शिवकालीन किल्ला स्पर्धेचे आयोजन युवा चेतना मंच कामठी तर्फे कामठी तालुका मध्ये करण्यात आले होते . या स्पर्धेचे पुरस्कार वितरण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे सी आर पी एफ चे निवृत्त सैनिक शेषराव अढाऊ , माजी नगरसेवक प्रतिक पडोले , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक मुकेश चकोले , रामटेक विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह आकाशी भोंगे ,नित्य पूजन समितीचे समन्वयक अनिल गंडाईत, नागपूर जिल्हा कामगार मजूर संघटनेचे सचिव हितेश बावनकुळे, दिव्यांग फाउंडेशनचे सचिव बॉबी महेंद्रा , वरीष्ठ शिक्षक यशपाल गंगराज , कामठी निधी अर्बन बैंक चे संचालक नितीन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.
याप्रसंगी महाराजांची विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती नगर प्रभाग क्रमांक १६कामठी येथील चमुने तयार करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम पुरस्कार तर श्रीराजे बजरंग पार्क येथील चमुने तयार करण्यात आलेल्या किल्ला प्रतिकृतीला द्वितीय पुरस्कार तर दुर्गा चौक कामठी येथील मॅक्झिन कम्प्युटर जवळील किल्ल्याच्या प्रतापगड प्रतीकुतीला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले . सर्व चमुला शिवकालीन शिवाजी महाराजांची राजमुद्रा व प्रशस्तीपत्र- सम्मानपत्र प्रदान करण्यात आले . तर सोबतच रनाळा येथील दत्तात्रय नगर येथील अतुल चोरघडे यांच्या नेतृत्वाखाली चमूला प्रोत्साहनपर सन्मान प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले . पुरस्कार वितरण आयोजन शिव उत्सव प्रमुख मयूर गुरव यांच्या नेतृत्वात करण्यात आले. श्री शिव नित्य पुजा समीतीने विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पराग सपाटे तर आभार प्रदर्शन अक्षय खोपे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अमोल नागपुरे, अतुल चोरघडे, अल्केश लांजेवार ,न्रमता आढाऊ,रुपेश चकोले ,आदींनी परिश्रम घेतले.