युवा चेतना मंच तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पुजन व गुडी उभारून साजारे केले नववर्ष

संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 02 – युवा चेतना मंच तर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिषेक व विधिवत पुजन करून मंगल्याचे प्रतिक गुडी उभारून , शिवस्तुति घेऊन प्रसाद वितरण करूण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे नववर्ष उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रंसगी कामठी अर्बन निधी बैंक चे अध्यक्ष नितिन ठाकरे , डायरेक्टर नरेश सोरते, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकांत अमृतकर , दिव्यांग बहुउद्देश्यीय संस्थेचे अध्यक्ष बाँबी महेंद्र प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते. याप्रंसगी श्रीकांत अमृतकर यांनी अध्यक्षीय भाषणातून गुढीपाडवा या सणाचे महत्त्व व गुढी पाडव्याची पार्श्वभूमी व इतिहास यावर मार्गदर्शन केले . तर विशेष अतिथी म्हणून नितिन ठाकरे यांनी आपण सर्वांनी मिळून असेच भारतीय संस्कृतीला शोभेल असे नव वर्ष साजरे केले पाहिजे व युवा चेतना मंच यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले . कार्यक्रमाचे संयोजन शिवउत्सव प्रमुख मयुर गुरव यांनी केले . सुत्रसंचालन प्रा पराग सपाटे , प्रस्ताविक अमोल नागपुरे , आभार प्रदर्शन अक्षय खोपे यांनी केले. या प्रंसगी युवा चेतना मंच सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

९,१० एप्रिल ला पुण्यात बसपाचे  प्रदेश स्तरीय प्रशिक्षण व चिंतन शिबिर

Sat Apr 2 , 2022
नागपुर – नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बसपा ला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याने बसपाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी ह्यांनी देशपातळीवर संघटनेची पुनर्बांधणी ची सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश स्तरावर  दोन दिवसीय एका प्रशिक्षण व चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश प्रशिक्षण व चिंतन शिबिर 9 व 10 एप्रिल रोजी पुण्याच्या कॅम्प परिसरात होत असून याला प्रमुख मार्गदर्शक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com