संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असून यासाठी इंटरनेट ही आवश्यक बाब झाली आहे.प्रत्येक व्यवहार ऑनलाईन केला जात असल्याने व्यवहारात पारदर्शकता यावी म्हणून प्रत्येक बाबीना इंटरनेट शी सांगड घातली जात आहे. आजतागत या जगातील कोणतीही गोष्ट म्हटली तर त्यांचे गुण अवगुण हे असतातच तशीच बाब आता इंटरनेटच्या बाबतीतही पडून येत असल्यामुळे आजची तरुणाई ‘ऑनलाईन जुगार’या खेळाच्या जाळ्यात चांगलीच गुरफटत चालली असल्याचे चित्र पहावयास दिसून येत आहे.
सध्या साधारण किमतींमधील भ्रमणध्वनिसह लाखमोलाचे भ्रमणध्वनी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.यात अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला असून या सुविधांमुळे हा भ्रमणध्वनी हातातील एक संगणकच बनला आहे.परंतु यामध्ये सुविधा हा एक चिंतेचा विषय ठरत असल्याने मग आता हा मोबाईल शाप की वरदान हा ही संशोधनाचा विषय ठरत आहे.
मोबाईल मधील फेसबुक, व्हाट्सएप या समाज माध्यमांचा अतिरेकी वापर होत असतानाच मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्यासाठी अनेक ऐप आहेत ते ऐप डाऊनलोड करताना संबंधित कंपनीकडून अटी व शर्ती सांगितल्या जातात व ऐप डाऊनलोड केल्या नंतर युजरकडून बँकेचा डाटाही मागितला जातो .अनेकवेळा ओटीपी च्या माध्यमातुन बराचसा डाटा संबंधित कंपन्यांकडे जातो .यासह ऑनलाईन रमी खेळा आणि पैसे जिंका ,ऑनलाईन रमीवर या 50 हजार, एक लाखाचा बोनस घ्या …अशा टॅग लाईन वापरून या ऑनलाईन रमी खेळाकडे आकर्षित केल्या जात आहे.मात्र या ऑनलाईन जुगाराच्या खेळात आजच्या तरुणाईच्या आयुष्याचा खेळ होत आहे तर दुसरीकडे या ओंनलाईन जुगाराच्या नादात तरुणावर कमावलेली रक्कम गमावून कर्जबाजारी होण्याची देखील वेळ येत आहे त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन आळा घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
-ऑनलाईन अशा कोणत्याही खेळात तरुणांनी गुंतू नये कारण मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार या प्रलोभणाला तरुण फसतात आणि फसल्या नंतर टोकाचा मार्ग निवडतात यासाठी पालकानाही सजग राहण्याची आवश्यकता आहे.