संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलंकार नगर रणाळा मार्गे स्मशान वळण मार्गाहून मिहान कडे दुचाकी ने जात असता रणाळा कडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकी चालकाने दिलेल्या जोरदार धडकेतुन घडलेल्या गंभीर अपघातात मिहान कडे जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 4 वाजेदरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सागर श्यामकुमार पाटील वय 23 वर्षे रा दुर्गा सोसायटी येरखेडा,कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर मृतक तरुण हा काल दुपारी 4 वाजता राहत्या घरून निघत नागपूर मिहान ला जाण्यासाठी दुचाकी क्र एम एच 40 सी बी 8294 ने सदर घटनास्थळ मार्गे जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या जावा नामक दुचाकी क्र एम एच 40 सी व्ही 4429 ने दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या गंभीर अपघातात जख्मि दुचाकीस्वारला नजीकच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले मात्र उपचारदारम्यान सदर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यासंदर्भात मृतक सागर पाटील च्या वडिलाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दुचाकी क्र एम एच 40 सी व्ही 4429 च्या चालकविरुद्ध भादवी कलम 279,304 (अ)अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.