संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 15:- तरुणांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून समाज कार्य करण्याचे आवाहन कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी शिवराज्य प्रतिष्ठान कामठी शाखेच्या वतीने निंबाजी वस्ताद आखाडा सभागृहात आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले . कार्यक्रमाची सुरुवात कामठी कंटोनमेंट बोर्डाचे मुख्यअभिलाशी अधिकारी अभिजीत सानप यांचे हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत डॉ राजे मुधोजी भोसले होते.तर कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तागडे , गणपतराव वस्ताद अखाड्याचे संस्थापक होनाजी भोतमांगे , माजी नगरसेवक राजू पोलकमवार, संजय कनोजिया , श्रावण केळझरकर, सरिता पैडलवार,पंकज नालेंद्रवार,अनिल देशमुख ,विजय कोंडुलवार आदी उपस्थित होते .
कार्यक्रमात दहावी-बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विध्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा उपस्थित पाहुण्यांचे हस्ते स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याकार्यक्रमादरम्यान गणपतराव वस्ताद आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी विविध शारीरिक कसरती, दानपट्टा ,आखाड्याचे प्रात्यक्षिके सादर करून पाहुण्यांचे व प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रीमंत डॉक्टर राजे मुधोजी भोसले, मुख्यअधिशासी अधिकारी अभिजीत सानप, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तागडे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून कार्यरत राहण्याचे समयोचित आवाहन केले. कार्यक्रमाला राजेश खंडेलवाल, कमल यादव ,राजेश बांडेबूचे ,प्रा नीरज यादव, आकाश भोकरे ,एडवोकेट भूषण तिजारे, प्रवीण फायदे पंकज वर्मा , विजय कोंडुलवार,तुषार पोटभरे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कीर्ती शिवरकर यांनी केले संचालन वैशाली महल्ले यांनी केले व आभार प्रदर्शन सीमा खुर्गे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रशेखर तूपट ,गणेश सायरे, हर्षल पोटभरे, अनिकेत तरारे, प्रणव कडव, आयुष्य शेंडे, तुषार पारसे , नकुल डाके, अश्विन कारनोके, प्रकाश फारसे आदींनी परिश्रम घेतले.