कोदामेंढी :- संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकाल लागताच सोशल मीडियावर या निमित्ताने मिम्स चा पाऊस पडला असून, नेटकऱ्यांनी अनेक गमतीशीर मीम्स शेअर केले आहे. निकालानंतर नेटकरी अनेक नेत्यांची फिरकी घेताना दिसत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या 25 वर्षापासून गड असलेला व संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या सावनेर विधानसभा क्षेत्र यंदा भाजपाचे आशिष देशमुख यांनी भेदून काढलाय. त्यांनी सुनील केदार यांच्या पत्नीअनुजा केदार यांच्या 26 हजार व काही मतांनी पराभव केल्याने, सुनील केदार व आशिष देशमुख यांच्या वर तयार केलेला मीम्स, सध्या खूपच वायरल झालेला आहे, बघतोस काय रागाने, तुला चितपट केलय वाघाने, हा गमतीदार मीम्स वायरल करून नेत्यांची फिरकी घेत आहे.
बघतोस काय रागाने ,तुला चितपट केलय वाघाने ,गमतीशीर मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी घेतली नेत्यांची फिरकी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com